Wednesday, June 26, 2024

‘भेडिया’वर 16व्या दिवशीही ‘दृश्यम 2’ भारीच, आयुष्मानचा ‘ऍन ऍक्शन हिरो’ खातोय गटांगळ्या

शुक्रवारी (दि. 02 डिसेंबर) अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘ऍन ऍक्शन हिरो‘ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाकडून निर्मात्यांना भरपूर अपेक्षा होत्या, पण आयुष्मानच्या इतर सिनेमांसारखे यश या सिनेमाला मिळू शकले नाही. पहिल्याच दिवशी या सिनेमाने नांग्या टाकल्या. याव्यतिरिक्त आता अजय देवगण याचा ‘दृश्यम 2‘ याचा जलवा दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. दुसरीकडे, वरुण धवन याच्या ‘भेडिया‘ने निर्मात्यांना निराश केले आहे. चला तर शनिवारी या तिन्ही सिनेमांनी किती गल्ला जमवला, हे जाणून घेऊया…

ऍन ऍक्शन हिरो
आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याचा ‘ऍन ऍक्शन हिरो’ (An Action Hero) हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. असे वाटत होते की, आयुष्मानला पहिल्यांदाच ऍक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करतील, परंतु पहिल्याच दिवशी या सिनेमाने खूप कमी कमाई केली. या सिनेमाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर या सिनेमाने फक्त 1.70 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाची एकूण कमाई जवळपास 3.01 कोटी इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

दृश्यम 2
अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याच्या ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता 16 दिवस उलटले आहेत. तरीही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झाली नाहीये. याचा अंदाज तिसऱ्या शनिवारच्या कमाईवरून लावला जाऊ शकतो. 16व्या दिवशी सिनेमाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सुरुवातीच्या आकड्यांनुसार, या सिनेमाने 16व्या दिवशी 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 175.93 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

भेडिया
अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा ‘भेडिया’ (Bhediya) मागील आठवड्यात रिलीज झाला आहे. मात्र, हा सिनेमा अपेक्षेनुसार कामगिरी करत नाहीये. पहिल्या वीकेंडला या सिनेमाने बरी कमाई केली होती. मात्र, ‘दृश्यम 2’च्या तुलनेत या सिनेमाने खूपच कमाई केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

दुसऱ्या शनिवारी या सिनेमाने फक्त 3.25 कोटींची कमाई केली. या सिनेमाने आतापर्यंत एकूण 47.37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मितीसाठी 60 कोटींहून अधिक रुपये खर्च झाला आहे. आता हा सिनेमा बजेटपेक्षा जास्त कमाई करतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जेव्हा शशी कपूरांनी शर्मिला टागोर यांची केलेली मस्करी; म्हणाले होते, ‘जेनिफर तुझ्याकडे दुधाचे पैसे…’
राजबिंडा अभिनेता म्हणून ओळख मिळवलेल्या शशी कपूर यांनी विसाव्या वर्षी केले होते 5 वर्ष मोठ्या जेनिफरसोबत लग्न

हे देखील वाचा