Monday, May 27, 2024

‘आपला देश अजूनही होमोफोबिक विचारात अडकला आहे’, असं का म्हणाला आयुष्मान खुराना?

बालिवूडचा लाेकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराना हटके सिनेमांसाठी ओळखल्या जाताे. चित्रपट निवड आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी अभिनय विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, आयुष्मानसाठी हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. या वर्षी त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करू शकले नाहीत. ‘डॉक्टर जी‘ आणि ‘अनेक‘ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्याचवेळी, बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर अभिनेत्याने मोठे विधान केले आहे.

आयुष्मान (Ayushmann Khurrana) म्हणाला, “मी हिट आणि फ्लॉपची चिंता न करता प्रोजेक्ट्सवर काम करण्यास प्राधान्य देतो. भारत हा होमोफोबिक देश आहे.” आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात केलेल्या चित्रपटांबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, “मी माझ्या करिअरची सुरुवात अशा चित्रपटांनी केली, ज्यात काम करणे बहुतेक कलाकारांना आवडत नाही. हे चित्रपट लीगमधून थोडेसे बाहेर गेले. मात्र, या चित्रपटांना चांगला व्यवसाय करता आला नाही. कारण, आपला देश होमोफोबिक देश आहे आणि हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.”

या मुद्द्यावर बोलताना आयुष्मान पुढे म्हणाला, “एक अभिनेता म्हणून मला जोखीम पत्करावीच लागते, जोखीम न घेता मी माझ्या करिअरमध्ये फार चांगले काम करू शकणार नाही. जर मी जोखीम घेणे थांबवले तर मी एका ठिकाणी स्थिर होईल.” आयुष्मान म्हणाला की, “एक अभिनेता म्हणून त्याने नेहमीच मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्यामुळे ताे नवीन कटेंट पाहूनच चित्रपट ठरवताे. तो म्हणाला की,”त्याचे बहुतेक चित्रपट कमी बजेटचे असतात. त्यामुळे एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही तर त्याचे फारसे नुकसानही होत नाही.”

आयुष्मान खुराना याच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर आयुष्यमान लवकरच ‘अ‍ॅन ऍक्शन हिरो’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता आयुष्मानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हाही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरणार की धूम ठोकणार हे आलेला काळाच सांगेल.(bollywood actor ayushmann khurrana says he does not care if film hits or flops at box office as india is a homophobic country)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
सुंबूलला शालीनचे वेड; सलमान खानने रागवल्यानंतर ढसाढसा रडत ‘इमली’ म्हणाली, ‘मला घरी…’

आहा कडकच ना! संजनाचा हटके अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा