सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ‘या’ कारणामुळे केली रणवीर सिंगच्या ‘८३’ सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी


मागील अनेक महिन्यापासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते अखेर तो बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘८३’ सिनेमा प्रदर्शित झाला. अतिशय दिमाखदार सोहळ्यात चित्रपटाचा प्रीमियर पार पडला. कलाकारांसोबतच, समीक्षक आणि प्रेक्षक देखील या सिनेमाचे कौतुक करताना थकत नाही. मात्र अशातच सोशल मीडियावर हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे. अनेक लोकं हॅशटॅगचा वापर करून हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण अभिनित आणि कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा सिनेमा भारताने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या पहिल्या वर्ल्डकपची गोष्ट सांगणारा सिनेमा आहे. या सिनेमाच्या बॉयकॉटची मागणी करणाऱ्यांमध्ये सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर आहेत.

ट्विटरवर हा सिनेमा बोलीकोट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. एकाने ट्विट करत लिहिले आहे की, “रणवीर सिंगने सुशांत सिंग राजपूतवर अनेकदा विनोद केले आहेत. आता आपल्याला एकत्र येऊन या सिनेमाला सुपर-डुपर फ्लॉप करायचे आहे. अजून एकाने लिहिले, “बॉयकॉट ८३ तयार राहा, आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे ट्रेंड करायचे आहे. सुशांत सिंग एक खूपच चांगला व्यक्ती होता. एकाने लिहिले, “फक्त सिनेमेच नाही तर आपण या सर्वांना बॉयकॉट केले पाहिजे. तेव्हाच हे फेमिनिज्म आणि हिंदूफोबिया यांसारख्या गोष्टींमधून बाहेर येऊ शकतात. हे सर्व बिघडलेले मुलं आहेत.” याशिवाय काहींनी तर “बॉयकॉट बॉलिवूड” हा हॅशटॅग देत सिनेमाला नाकारले आहे.

याआधी सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडला बॉयकॉट करायची मोठी मागणी उठली होती. अनेक कलाकारांनी सुशांत सिंगच्या निधनानंतर मानसिक तणावावर जागरूकता पसरवण्यासाठी पुढाकार घेतला होता. हीच गोष्ट अनेक सुशांत सिंग राजपुतच्या फॅन्सला आवडली नाही आणि त्यांनी चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी केली.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!