‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या वेबसीरिजमधील मुन्नाभाईचा मित्र ललितचे पात्र निभावणार ब्रम्हा मिश्रा याचे निधन झाले आहे. या बातमीने त्याच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना धक्का बसला आहे. २९ नोव्हेंबरला ब्रम्हाच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्याला डॉक्टरांनी गॅसचे औषध दिले होते. अशातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि ३२ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
ब्रम्हा मिश्रा याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. परंतु सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. तीन दिवसानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या बॉडीचे पोस्टमार्टम केले आहे. जेणेकरून त्यांचा मृत्यू कसा आणि कधी झाला हे समजत आहे. (brahma mishra of Mirzapur died of heart attack the body was lying in the bathroom for three days)
ब्रह्मा मूळचा भोपाळजवळील रायसेनमध्ये राहत होता. त्याने रायसेनमध्ये १० वी प्रयत्न शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे वडील भूमी विकास बँकेत काम करत होते. तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आला होता. मुंबईला आल्यानंतर त्याच्या या संघर्षाच्या दिवसात त्याच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने त्याने पाठिंबा दिला होता.
Actor #BrahmaMishra, popular as #Lalit from the Amazon series #Mirzapur passes away.
He was also seen in films like Haseen Dillruba, Hello Charlie, Kesari, Dangal, Badrinath Ki Dulhania, Hawaizaada, Manjhi and series like Office Vs Office and Not Fit.
Rest In Peace ???? pic.twitter.com/gNyPPNFm14
— CinemaRare (@CinemaRareIN) December 2, 2021
त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २०१३ साली ‘चोर चोर सुपर चोर’ मधून केली होती. त्याने २०२१ मध्ये तापसी पन्नूसोबत ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटात काम केले होते. ज्यात त्याचा छोटासा रोल होता.
मिर्झापूरसोबतच ब्रह्माने ‘केशरी’, ‘मांझी’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात काम केले आहे. त्याने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्याने बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु एवढ्या लवकर त्याचा प्रवास संपेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा










