अतिसुंदर! विश्वविक्रमी अभिनेते ब्रह्मानंद यांनी ४५ दिवसात कॅनवासवर साकारले भगवान बालाजी, पाहा कुणाला देणार स्केच भेट


तेलगू चित्रपटसृष्टीतील जेष्ठ विनोदी अभिनेते ब्रह्मानंद उत्कृष्ट अभिनेते तर आहेच सोबत उत्तम स्केच आर्टिस्ट देखील आहे. त्यांच्या या कलेचा उत्तम नमुना नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे. ब्रह्मानंद हे साऊथ चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख आणि नावाजलेले नट आहे. त्यांनी असंख्य चित्रपटात काम केले आहे. खूप कमी लोकांना हे माहित असेल की ते एक चांगले स्केच आर्टिस्ट देखील आहे.

ब्रह्मानंद यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांचा जवळचा मित्र असलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनला त्यांच्या हातांनी बनवलेले बालाजी यांचे स्केच भेट म्हणून दिले आहे. नुकतेच अल्लू अर्जुन याने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे.

अल्लूने या स्केच चा फोटो शेयर कट लिहिले की, ” आज मला सर्वात अमूल्य असलेली भेट ब्रह्मानंदम गारू यांच्याकडून मिळाली आहे. ४५ दिवसांची मेहनत म्हणजे हे हाताने बनवलेले पेन्सिल स्केच. खूप खूप धन्यवाद.” ही पोस्ट शेयर करताच अल्लू अर्जुनच्या या पोस्टला अनेक लोकांनी ब्रह्मानंद यांचे आणखी काही पेन्सिल स्केचचे फोटो कमेंट मध्ये पोस्ट केले आहे. ब्रह्मानंद हे हिंदू देवी आणि देवतांचे स्केच बनवण्यात माहीर असून, त्यांनी अनेक स्केच बनवले आहेत. याआधी त्यांनी राम आणि हनुमान यांच्या गळाभेटीचे स्केच बनवले होते.

ब्रह्मानंद हे तेलगू सोबतच हिंदी, तामिळ आणि कन्नड भाषांतील चित्रपटांमध्येही काम करतात. ४० वर्षांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी आजवर १००० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. १००० चित्रपटांमध्ये काम केल्याने त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २००९ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.