Friday, April 26, 2024

दहा वर्षांची मेहनत फळाला आली! ‘ब्रह्मास्त्र’च्या स्पेशल स्क्रीनिंगला धाय मोकलून रडले अयान मुखर्जी

सध्या बॉलिवूडला चांगले दिवस नसल्याचे दिसते. बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंड, सोशल मीडियावर हिंदी सिनेमांविषयी होत असलेल्या चिखलफेकीच्या वातावरणातही अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र‘ हा सिनेमा 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, या सिनेमावर ट्रोलर्सचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. हा सिनेमा दरदिवशी बक्कळ कमाई करत चालला आहे. विशेष म्हणजे, अयान यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वीच या सिनेमाची घोषणा केली होती. त्यावेळी कोणीही विचार केला नव्हता की, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करेल.

परंतु प्रदर्शित झाल्याच्या दोन दिवसातच ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमाने बक्कळ कमाई करत सर्वांनाच हैराण केले आहे. प्रेक्षक हा सिनेमा आयमॅक्स 3डीवर पाहणे पसंत करत आहेत. दुसरीकडे, बॉलिवूड कलाकारही या सिनेमाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. मात्र, प्रदर्शनापूर्वी या सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) भावूक झाल्याचे दिसले होते.

फोटो जोरदार व्हायरल
खरं तर, सोशल मीडियावर या स्पेशल स्क्रीनिंगचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अयान मुखर्जी दिसत आहेत. फोटोत दिसते की, अयान मुखर्जी स्टेजवर बसले आहेत आणि ते पत्रकारांशी बोलत आहेत. यादरम्यान ते खूप भावूक होतानाही दिसत आहेत. त्यांच्यासोबत सिनेमातील मुख्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हादेखील दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्यदेखील आहे.

विशेष म्हणजे, अयान मुखर्जींनी या 10 वर्षांमध्ये कोणत्याही दुसऱ्या सिनेमाचे दिग्दर्शन केले नाहीये. त्यामुळेच ‘ब्रह्मास्त्र’ हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे. हा सिनेमा 3 भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाची तुफान कमाई
प्रदर्शनापूर्वी ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाला बॉयकॉटचा सामना करावा लागला होता. ट्विटरवर दीर्घ काळापासून ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंडही सुरू आहे. मात्र, तरीही या सिनेमाने दमदार सुरुवात केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 36 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाच्या कमाईत 50 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. रणबीरच्या या सिनेमाने शनिवारी (दि. 10 सप्टेंबर) एकूण 41.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे, साऊथबद्दल बोलायचं झालं, तर तिथेही ‘ब्रह्मास्त्र’ कमाल करत आहे. साऊथमध्ये या सिनेमाने पहिल्या दिवशी 4 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 3 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अटकेच्या मागणीनंतर गायक जुबीन नौटियालची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला आता देश…’
कोट्यवधींचा मालक असलेल्या रणबीरची पहिली कमाई माहितेय का? आकडा ऐकून व्हाल चकित
साऊथच्या सिंघम सूर्याची पत्नी ज्योतिकालाही मिळाला आहे राष्ट्रीय पुरस्कार, जाणून घ्या त्यांची प्यार वाली लव्हस्टोरी

हे देखील वाचा