Friday, July 5, 2024

‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’च्या शूटींगला सुरुवात, ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित असलेल्या वेबसीरिजच्या शूटिंग सुरू झाली आहे. या वेबसीरिजचे नाव आहे “वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स”. या वेबसीरिजचे दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले आहे. या वेबसीरिजमध्ये वीर सावरकरांच्या आयुष्यातील विविध पैलूंचा मागोवा घेतला जाणार आहे. यामध्ये त्यांच्या लहानपणापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षापर्यंतचे सर्व काही दिसणार आहे.

या वेबसीरिजमध्ये मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची ( Veer Savarkar)  भूमिका साकारणार आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ घटस्थापनेच्या दिवशी पुणे येथिल 19 ऑक्टोबर रोजी भोर येथील राजवाड्यात झाला. यावेळी दिग्दर्शक योगेश सोमण, अभिनेता सौरभ गोखले आणि इतर टीम सदस्य उपस्थित होते. या वेबसीरिजचे चार सीझन असणार आहेत. पहिल्या सीझनमध्ये वीर सावरकरांच्या जन्मापासून ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा काळ दाखवला जाणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती एका मोठ्या वितरक कंपनीने केली आहे. या वेबसीरिजचा प्रीमियर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे आहे. तसेच सामाजिक सुधारणा, क्रांतीकारांची चळवळ आणि हिंदू चळवळीत सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी नवीन वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित अनेक नाटकं आणि चित्रपट प्रेक्षकांनी पाहिले आहेत. मात्र पहिल्यांदाच त्यांच्या जीवनावर आधारित वेब सिरीज बनत आहे. ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स’ असं या वेब सिरीजचं नाव आहे. हिंदी भाषेतून ही वेब सिरीज असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saurabh Gokhale (@sauraabhgokhaale)

4 सिझनमध्ये ही वेब सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पुढच्या वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 26 फेब्रुवारीला वेब सीरिज प्रदर्शित केली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजाच्या समोर आले पाहिजे. या वेब सिरीजच्या माध्यमातून सावरकरांचा जवळपास शंभर वर्षांचा इतिहास मांडला जाणार आहे. (Bringing freedom to India veer savarkar secret files new hindi webseries shooting start saurabh gokhale playing main role)

आधिक वाचा-
पैशावाल्यांचे गिफ्ट बी भारीच राव! हार्दिकने अक्षयाला दिले तब्बल ‘इतक्या’ लाखांची भेट, किंमत वाचून तुम्ही व्हाल..
आनंदाची गाडी सुटली! ‘झिम्मा 2’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

हे देखील वाचा