Tuesday, June 18, 2024

मी माझ्याबद्दल बोललो नाही…! “वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स” या हिंदी वेबसिरीजची घोषणा, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

सर्वच लोकांसाठी स्वातंत्रवीर सावरकर म्हणजे दैवत आहे. सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर सावरकरांनी खूप मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली. आज जरी त्यांच्या कामावर, कर्तृत्वावर अनेक जणं प्रश्नचिन्ह उपस्थित करत असले तरी त्यांचे कर्तृत्व हे कधीच नाकारता न येण्यासारखे आहे. अनेक पुस्तकांमधून आणि अनेक वक्त्यांकडून बऱ्याचदा आपल्याला त्यांच्या कामाविषयी समजले असेल, मात्र आता तर थेट त्यांच्या आयुष्यावर आधारित एक हिंदी वेबसिरीजच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजमध्ये आपला सर्वांचा लाडका मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची भूमिका साकारणार असून याबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saurabh Gokhale (@sauraabhgokhaale)

सौरभने नुकत्याच २८ मे रोजी झालेल्या सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने लिहिले, “मी विनायक दामोदर सावरकर! तात्याराव सावरकर… हिंदुहृदयसम्राट सावरकर… स्वातंत्र्यवीर सावरकर… होय आणि माझ्या टीकाकारांच्या मते देशद्रोही सावरकर… देशद्रोही आणि सावरकर? मी माझ्याबद्दल फार बोललो नाही…काळ खूप वेगाने पुढे सरकत आहे… इतिहास नाहीसा होतो मग विनायक दामोदरसारख्या सामान्य माणसाची गोष्ट कोण लक्षात ठेवील? पण कथा कोणा एका विशिष्ट व्यक्तीची नाही.. ती व्यक्ती घडवणाऱ्या सामान्य-असामान्य लोकांची आहे! तो ज्या मातीत जन्मला, जिथे तो वाढला, त्याचा इतिहास म्हणजे त्याची कहाणी. माझी गोष्ट सांगायच्या आधी मनात विचारांचे वादळ उठले… माझ्या आयुष्याबद्दल कसं सांगू? मी काय सांगावं ? आणि आणखी…’वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’…लवकरच”.

यासोबतच त्याने त्याच्या या आगामी ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेब सीरिजचे पोस्टर देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. दरम्यान ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार असून याची निर्मिती डॉ. अनिरबन सरकार करणार आहेत. ही सीरिज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. सौरभने मराठीमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले असून आता तो हिंदी ओटीटी माध्यमामध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल
आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक, आलिया भट्टने रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा दौरा

हे देखील वाचा