Sunday, January 26, 2025
Home अन्य बीटीएस गायक जंगकुकचा ‘फॉलिंग’ कव्हर व्हिडिओ रिलीझ, चाहते करतायेत भरभरून कौतुक

बीटीएस गायक जंगकुकचा ‘फॉलिंग’ कव्हर व्हिडिओ रिलीझ, चाहते करतायेत भरभरून कौतुक

बीटीएस गायक जंगकुकने अलीकडेच ‘फॉलिंग’चे कव्हर गाणे शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. हे गाणे इंग्रजी गीतकार हॅरी स्टाइल्सने २०१९ मध्ये ‘फाईन लाइन’ अल्बममध्ये प्रदर्शित केले होते. पॉपच्या सर्वात तरुण गायक जंगकुकने हे गाणे स्वतःच्या स्टाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे.

हे गाणे यूट्यूबवर शेअर करण्यात आले आहे. गाणे एचवायबीईचे स्टुडिओ अभियंता जीन बो येऑन यांनी रेकॉर्ड केले आहे. हे गाणे काही तासांतच सोशल मीडियावर गाजले आहे. या गाण्याच्या व्हिडिओने तासाभरातच २० लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी ‘फॉलिंग’चे केले जोरदार कौतुक
जंगकुकच्या ‘फॉलिंग’चे कव्हर ऐकून बीटीएस सदस्य जे होपही चकित झाले होते. रॅपरने जंगकुकला विचारले की, तू हे गाणे कधी केले आहेस. हे खूप चांगले आहे. जंगकुकचे हे गाणे चाहत्यांनाही आवडले आहे. त्याच्या सुंदर आवाजासोबतच या नवीन व्हर्जनचेही चाहते कौतुक करत आहेत.

याआधी आंतरराष्ट्रीय गाण्यांचे कव्हर केले आहेत प्रदर्शित
एका चाहत्याने सांगितले, जंगकुकने ‘फॉलिंग हे गाणे हॅरी स्टाइल्स गायले आणि अंदाज लावला की, २ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बीटीएसचा शेवटचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. बीटीएसने २०२० मध्ये सोल टूरचा नकाशा आखला होता. साथीच्या रोगामुळे कॉन्सर्टला उशीर झाला आणि नंतर तो रद्द करावा लागला. बीटीएस ग्रुप ऑनलाइन म्यूझिक कॉन्सर्ट आयोजित करतो.

जंगकुकने आंतरराष्ट्रीय गाण्यांचे कव्हर प्रदर्शित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याआधी त्याने ॲडम लेव्हिनचे ‘लास्ट स्टार्स’, जस्टिन बीबरचे ‘नथिंग लाइक अस’ आणि चार्ली पुथचे ‘वी डोंट टॉक एनीमोर’ या गाण्यांचे कव्हर प्रदर्शित केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी

-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून

-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा