Sunday, July 14, 2024

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, पत्नीनेच केला जिवे मारण्याचा आरोप

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी बॉलिवूडला अनेक गाजणारे चित्रपट दिले आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी सेक्रिय असतात. सध्या ते चित्रपटामुळे नाही, तर आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. नुकतच त्यांच्या पत्नीने तिच्यावर हल्ला करण्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे दिग्दर्शक खूपच चर्चेत आले आहेत.

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कमल किशोर मिश्रा (Kamal Kishor Mishra) विरेधात त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार त्यांच्याच पत्नीने केली असून अंबोली पुलिसांनी दिग्दर्शकाला आईपीसी कलम 279 आणि 338 नुसार ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेमध्ये त्यांच्या पत्नीला डोक्यावर मार लागला असून ती खूप घायाळ झाली आहे. सध्या पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली आहे.

चौकशी दरम्यान मिश्राच्या पत्नीने सांगितले की, “मिश्राने मला (दि.19 ऑक्टोंबर) दिवशी त्याने कारने मला टक्कर मारली होती, ज्यामध्ये मी गंभीर रित्या घायाळ झाले होत. घटना घडलेल्या दिवशी मी मिश्राचा पाठलग करत त्याच्या मागे गेले, तेव्हा मी त्याला पार्कींग ऐरियामध्ये आपल्या कारमध्ये एका दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. जेव्हा मी त्यांच्याशी सामना करण्यासाठी गेले तेव्हा मिश्रा याने त्याच्या कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि या प्रक्रियेत त्याने मला धडक दिली आणि माझ्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. मला मारहाण करण्याची घटनाही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.”

चौकशी दरम्यन एका अधिकारीने सांगितले की, “कमल किशोर मिश्राला गुरुवारी (दि. 27 ऑक्टोंबर) दिवशी उपनगरीय मुंबई मध्ये चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये आणले होते. ही घटना ( दि. 19 ऑक्टोंबर) दिवशी अंधेरी (पश्मिम) मध्ये दंपति अपार्टमेंट पार्कींगमध्ये झाली होती, जेव्हा त्यांच्या पत्नीने कारमध्ये एका वेगळ्याच महिलेला पाहिले होते. आज दुपारी मिश्राला चौकशीदरम्यान आणले आहे.”

कमल यांनी एंटरटेनमेंट नावाने फिल्म प्रोडक्शन हाउस सुरु केले होते. नुकतच त्यांनी ‘देहाती डिस्को’ हा चित्रपट प्रोड्यूस केला होता. या चित्रपटामध्ये गणेश आचार्य पाहायला मिळाला होता. या शिवाय ‘शर्मा जी की लग गई’, ‘फ्लॅट नंबर 420’, सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. किशोरने ‘खल्ली बल्ली’ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. अशा अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे किशोर मिश्रा आज त्यांच्या वर्तवणूकीमुळे चौकीच्या पायऱ्या चढत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी वयाच्या 17व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याला करत होती डेट, आमिर खानसोबतही आहे खास नाते
अय्याे! करणवीर झाला पूनम पांडेसोबत रोमँटिक; ट्रोलर्स म्हणाले, ‘लवकरच घटस्फोट’

हे देखील वाचा