Friday, August 1, 2025
Home मराठी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, महिलांसोबत लहान मुलांचे आक्षेपार्ह सीन दाखवल्याने उडाला गोंधळ

महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल, महिलांसोबत लहान मुलांचे आक्षेपार्ह सीन दाखवल्याने उडाला गोंधळ

अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ‘नाय वरणभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरून वाद आणखी वाढला आहे. चित्रपटाच्या बोल्ड कंटेंटवर प्रश्न उपस्थित होत असतानाच, दोन संघटनांनी चित्रपटाविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोग आणि बाल आयोगानेही या चित्रपटाविरोधात कठोरता दाखवली आहे. चित्रपटात लहान मुलांना महिलांसोबत लैंगिक कृत्य करताना दाखवण्यात आले आहे. टीझर आणि ट्रेलरमध्ये कश्मिरा शाह (Kashmira Shah) एका मुलासोबत अनैतिक अवस्थेत दाखवण्यात आली होती. तसेच ट्रेलर रिलीझ झाल्यापासून या चित्रपटावर अनेक संघटनांच्या भुवया उंचावल्या आहेत. (case registered against mahesh manjrekar for showing sex scenes of children with women)

वांद्रे न्यायालयात खटला दाखल, २८ फेब्रुवारीला सूनवाई
माध्यमातील वृत्तानुसार, महाराष्ट्रातील दोन संस्थांनी या चित्रपटाविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. याप्रकरणी महेश मांजरेकर यांच्याविरोधात वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात ही तक्रार केली होती, त्यानंतर आता मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नरेंद्र, श्रेयांस हिरावत आणि चित्रपटाशी संबंधित एनएच स्टुडिओ यांनाही आरोपी करण्यात आले आहे. क्षत्रिय मराठा सेवा संस्थेचे वकील डीव्ही सरोज म्हणतात की, चित्रपटातील आशय समाजात चुकीचा संदेश देतो. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे.

पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी चित्रपटाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करणारा अर्जही दाखल करण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे. केवळ चित्रपटाच्या निर्मात्यांवरच नव्हे, तर त्यात काम करणाऱ्या मुलांच्या पालकांवरही कारवाई व्हायला हवी, असे आयोगाचे म्हणणे आहे.

भारतीय स्त्री शक्ती संघटनेचे वकील प्रकाश सालसिंगीकर म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना POCSO कायद्यांतर्गत शिक्षा झाली पाहिजे. २७ जानेवारी रोजी सत्र न्यायालयात पॉक्सो कायद्यान्वये खटला दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी ३१ जानेवारीला झाली. भारतीय स्त्री शक्तीच्या अध्यक्षा सीमा देशपांडे म्हणाल्या की, चित्रपटात ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलांचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे, ते अत्यंत लाजिरवाणे आहे.

१४ जानेवारीला रिलीझ झाला ट्रेलर
महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर १४ जानेवारीला रिलीझ झाला. त्यानंतर काही संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती. अहवालानुसार, राष्ट्रीय महिला आयोगाने चित्रपटाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यांवर सेन्सॉर करण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा टीझर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आला होता. परंतु चित्रपटात कोणतेही क्रॉपिंग झालेले नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा