Monday, July 15, 2024

Sushant Singh Rajput | प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती देण्यास सीबीआयचा स्पष्ट नकार, पण का?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Shushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. तपास यंत्रणा अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. आता सीबीआयने या प्रकरणी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. सीबीआयकडून माहितीच्या अधिकाराखाली या प्रकरणाची माहिती मागवण्यात आली होती. मात्र एजन्सीने या अर्जावर माहिती देण्यास नकार दिला आहे.

वृत्तसंस्थेनुसार, सीबीआय टीमने सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीच्या उत्तरात ते म्हणाले, “सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. तपासाच्या प्रगतीची माहिती यावर परिणाम करू शकते. मागितलेली माहिती देता येणार नाही.” (cbi refused to provide any information in sushant singh rajput death case)

सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईतील वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते, मात्र सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून सुप्रीम कोर्टाने तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआय व्यतिरिक्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देखील या प्रकरणाचा अंमली पदार्थांच्या कोनातून तपास करत आहे. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या भावालाही अटक करण्यात आली होती. मात्र नंतर जामिनावर दोघांची सुटका करण्यात आली.

सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूर यांनी सुशांतबद्दल मोकळेपणाने आपली भावना व्यक्त केली होती. शेखर कपूर म्हणाले होते की, जेव्हाही ते सुशांतसोबत बोलायचे, तेव्हा त्यांना असे वाटायचे की, ते एका खूप मोठ्या शास्त्रज्ञाशी बोलत आहेत. याच कारणामुळे त्यांना फक्त सुशांतसोबत ‘पाणी’ हा चित्रपट बनवायचा होता. खरंतर शेखर पाण्याच्या समस्येवर हा चित्रपट बनवणार होते. जिथे त्यांना या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की, लवकरच पृथ्वीवरील स्वच्छ पाणी संपणार आहे. त्याचबरोबर पेट्रोलपेक्षा पाणी महाग होणार आहे, पण हा प्रकल्प कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सुशांतने २०१४ मध्ये या चित्रपटासाठी साईन देखील केले होते, पण हा चित्रपट कधीच बनला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा