Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हसवून सर्वांना वेड लावणारी श्रेया बुगडे आपल्या साडीतील अदांनी पाडतेय सर्वांना भुरळ! थेट ब्रिटिश मॉडेलशी होतेय तुलना

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, हे शब्द बोलत ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आठवड्यात फक्त दोन दिवसांसाठी प्रेक्षकांच्या भेटीला येऊन, त्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर बाकी सोडली नाही. शोच्या या कामगिरीमध्ये, इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री श्रेया बुगडेचाही मोलाचा वाटा आहे. विविध कलाकारांची हुबेहुब नक्कल करून तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

कमालीची काॅमेडी टायमिंग असणारी श्रेया खऱ्या आयुष्यातही तितकीच स्टायलिश आहे. अलिकडेच तिने साडी परिधान केलेले तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. राखाडी रंगाच्या साडीत श्रेयाची सुंंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. या पारंपारिक लूकमध्येही तिचा स्टायलिश अंदाज कायम आहे. परफेक्ट हेेेेअर आणि परफेक्ट मेकअप तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.

हे फोटो पाहताच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. श्रेयाचे कौतुक करत अनेकांनी फोटोखाली बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर काहींनी तिची तुलना थेट ब्रिटिश माॅडेलशी केली आहे. श्रेयाने या अगोदरही तिचे साडीतील बरेच फोटो शेअर केले आहेत. तिचा प्रत्येक लूक नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.

श्रेयाने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘तू तिथे मी’, ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली.

मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

हे देखील वाचा