अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’

know about sairat fame rinku rajgurus lesser known facts


चाहत्यांची ‘आर्ची’ म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अवघ्या प्रेक्षकवर्गाला वेड लावले आहे. ‘सैराट’मध्ये रूबाबदार भुमिका साकारून तिने अफाट यश मिळवले आहे. रिंकू हल्ली सोशल मीडियावर राहणे पसंत करते. सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांना स्वत: बद्दल माहिती देत राहते. चाहतेही तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी बरेच उत्सुक असतात. पण रिंकूबद्दल अशी एक गोष्ट आहे, जी क्वचितच लोकांना माहिती असेल.

मुळची अकलूजची असलेली रिंकू लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. आई- वडील दोघेही शिक्षक असल्याकारणाने तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेेण्याची आवड आहे. शाळेत असताना ती सतत गाणी व नृत्याच्या स्पर्धांमध्ये सामील व्हायची. पण तुम्हाला माहिती आहे का? असे असूनही रिंकूने कधीही नाटक पाहिले नाही. होय, आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलेल्या रिंकूने, अद्याप नाटकामध्ये सहभागही घेतला नाही आणि ते पाहिलेही नाही.

विशेष म्हणजे, अकलूजला कधीही नाटक किंवा नाटकस्पर्धा आयोजित केल्या गेल्या नाहीत. कदाचित हेच कारण असेल, ज्यामुळे रिंकू अद्यापही नाटकापासून दूर आहे. मात्र, अलीकडेच एक कलाकार म्हणून तिने नाटक पाहण्याची ईच्छा व्यक्त केली होती. नाटक हा प्रकार जाणून घेण्यासाठी ती उत्सुक असल्याचेही तिने सांंगितले आहे.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट रिलीझ झाला आहे. याशिवाय तिने काहीच दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लय भारी! भर उन्हात घराबाहेर पॅपराजींना कोल्ड ड्रिंक पाजताना दिसला सोनू सूद, पंतप्रधान बनण्याच्या प्रश्नावर दिली अशी प्रतिक्रिया

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत


Leave A Reply

Your email address will not be published.