‘चला हवा येऊ द्या’ हा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. विनोदाच जबरदस्त डायमिंग, तितकीच पद्धतशीर मांडणी यामुळेच हा कार्यक्रम गेली आठ वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे अशा अनेक दिग्गज विनोदविरांची या मालिकेत भूमिका पाहायला मिळत आहे. सध्या चला हवा येऊ द्या टीमसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून खुद्द अभिनेत्री श्रेया बुगडेने याबद्दलचा खुलासा केला आहे.
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ चे नाव घेतले जाते.गेली ८ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आठ वर्षानंतर चला हवा येऊ द्या च्या टीमसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ज्याचा खुलासा श्रेया बुगडेने केला आहे. ही आनंदाची बातमी म्हणजे चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा लवकरच नवीन वास्तूमध्ये श्रीगणेशा होणार आहे.
अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने “तब्बल ८ वर्षांनी, नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे,” असे म्हणत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. श्रेयाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून नव्या वास्तूसोबत कार्यक्रमाचीही नवी उंची पाहायला मिळू द्या अशा बोलक्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अनेक बॉलिवूड तसेच मराठी सिने जगतातील कलाकार येत असतात. लवकरच सध्या चर्चेत असलेल्या ‘टाईमपास 3’ चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर धमाल करताना दिसणार आहे. त्यामुळेच आता या भागाचीही प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा –
रणवीर सिंगचा पाय आणखी खोलात! मनसेकडून गुन्हा दाखल, फोटो तात्काळ हटवण्याचा दिला इशारा
काय सांगता! ‘टाईमपास ३’ च्या सेटवर ऋता दुर्गुळेचा झालेला अपमान? कलाकारांनीच सांगितला संपूर्ण किस्सा
अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास