Thursday, November 21, 2024
Home मराठी महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्याच्या प्रेमकहाणीचा प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ सिनेमातून होणार उलगडा

महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्याच्या प्रेमकहाणीचा प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ सिनेमातून होणार उलगडा

लवकरच विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एक राजकारणात मुरलेला नेता आणि एका नृत्यांगनेच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा सध्या माहाराष्ट्रातच काय महाराष्ट्राबाहेरही चांगलाच गाजताना दिसत आहे. चंद्रमुखी सिनेमाचा टिझर पाहून अनेकांना प्रश्न पडत आहे की, हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे. हा सिनेमा एका अशा राजकीय नेत्याच्या संदर्भात आहे, ज्याचा महाराष्ट्रासोबतच दिल्लीमध्ये देखील राजकारणात चांगलाच दबदबा होता. त्या नेत्याचे साधारण आठ वर्षांपूवी एका रस्ते अपघातात निधन झाले आहे.

या सिनेमाच्या घोषणेनंतर अनेक चर्चाना ऊत आला आहे की नक्की असा कोणता राजकारणी होता ज्याच्यावर हा सिनेमा बेतलेला आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या क्षेत्रातील घरांचा नियमित सर्वे केला जात होता. या सर्वेला जाताना बीएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत काही पत्रकार देखील असायचे. अशाच एका दिवशी ही टीम एका घरी गेली त्या घरावर लावलेल्या नावाच्या पट्टीवर लिहिले होते ‘बरखा मुंडे’. तिथे असणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला याबाबत विचारले असता तो, म्हणाला हा फ्लॅट मुंडे साहेबांचा असून, ते रोजच तिथे येतात. बस झाले इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. याच संपूर्ण घटनेवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा आहे.

या सिनेमात अमृता खानविलकर ‘चंद्रमुखी’ ही भूमिका निभावत आहे. प्रत्यक्षात जेव्हा मुंडे साहेबांचा ‘तो’ मुद्दा सार्वजनिक झाला तेव्हा खूपच मोठा गदारोळ मजला. त्यांच्या राजीनाम्यापर्यंत गोष्टी पोहचल्या होत्या. त्याकाळात ‘बरखा बहार आई’ हे वाक्य खूपच प्रसिद्ध झाले. मुंडे साहेब ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या नेतृत्वांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे देखील ठरवले होते. तेव्हा मुंडे साहेब शिवसेनेचे सर्वेसर्वा असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. त्यानंतर बाळासाहेबांनी एकदम घाईघाईत शिवाजी पार्कवर एक सभा बोलवली. याच सभेत त्यांनी मुंडे साहेब आणि बरखा मुंडे यांच्यावर भाष्य केले. आणि मुंडे साहेबांकडे पाहत म्हटले की, “प्यार किया तो डरना क्या”.

दिग्दर्शक प्रसाद ओक याच्या या सिनेमाने महाराष्ट्रात पुन्हा त्याच चर्चाना सुरुवात करून दिली आहे. चंद्रमुखी ची भूमिका साकारणाऱ्या अमृता खानविलकरने सांगितले की, “ही भूमिका मला मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. या चित्रपटात लोकांना प्रेम, रोमान्स. समर्पण, संघर्ष आदी अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे. मी ही भूमिका निभावण्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत जीव ओतून काम केले आहे. मी काय आमच्या संपूर्ण टीमने यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.”

या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार असून, नुकताच तो रणवीर सिंगच्या ’83’मध्ये दिलीप वेंगसकर यांची भूमिका साकारताना दिसला होता. हा सिनेमा ज्या बरखा पाटील यांच्यावर आधारित आहे त्या मोठ्या लावणी कलाकार होत्या. त्या मूळच्या मराठवाड्याच्या असल्याचे सांगितले जाते. त्यांची आणि मुंडे साहेबांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली. त्यानंतर साहेब त्यांना मुंबईला घेऊन आले आणि एका पॉश परिसरात त्यांना एक फ्लॅट घेऊन दिला.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून, पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर असून, सिनेमाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. हा सिनेमा येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा