Thursday, July 18, 2024

KGF Chapter 2 | चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू, केवळ १२ तासांतच केली बंपर कमाई!

‘केजीएफ चॅप्टर २’ लवकरच रिलीझ होणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ रिलीझ होण्यापूर्वीच हा चित्रपट बंपर कमाई करू शकतो, असे मानले जात होते. यश अभिनित ‘केजीएफ चॅप्टर २’चे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. प्री-बुकिंग सुरू झाल्यापासून या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे. वास्तविक, आगाऊ बुकिंग सुरू झाल्यानंतर १२ तासांतच चित्रपटाची पाच हजारांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत. यावरून या चित्रपटाची चाहते किती आतुरतेने वाट पाहत आहेत आणि प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट चांगली कमाई करेल, याचा अंदाज बांधता येतो.

‘केजीएफ’चा पहिला भाग २०१८ साली आला होता. कोरोना महामारीमुळे ‘केजीएफ’ रिलीझ होण्यास उशीर झाला. आता अखेर प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे. या चित्रपटात यश (Yash), श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) रवीना टंडन (Raveena Tandon) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (kgf chapter 2 advance ticket booking started highest ticket sale in uk)

यशच्या ‘केजीएफ २’बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. देशातच नाही, तर परदेशातही या चित्रपटाबद्दल चाहत्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘केजीएफ २’ने प्री-बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत यूकेमध्ये पाच हजारांहून अधिक तिकिटे विकली. अशा परिस्थितीत, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. ‘केजीएफ २’ हा ग्रीसमध्ये प्रदर्शित होणारा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट ठरला आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ बॉक्स ऑफिसवर ‘आरआरआर’चा रेकॉर्ड मोडू शकेल का, हे चित्रपट रिलीझ झाल्यानंतरच कळेल. पण ‘केजीएफ २’ला १३ एप्रिलला रिलीझ होणार्‍या विजयच्या ‘बीस्ट’ आणि १४ एप्रिलला रिलीझ होणार्‍या शाहिद कपूरच्या ‘जर्सी’चा सामना करावा लागणार आहे. यावरून तिन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होणार, हे स्पष्ट झाले. तरी या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे १४ एप्रिलनंतरच कळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा