Tuesday, March 5, 2024

‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. यासाेबत उर्फी तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती दररोज इंस्टाग्रामवर तिच्या क्रिएटिव्ह लूकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र, उर्फीला तिच्या अतरंगी फॅशनसेन्समुळे अनेकदा ट्राेलिंगचाही सामना करावा लागताे. यापैकीच एक नाव फैजान अन्सारीचेही आहे. फैजान अनेकदा उर्फीच्या विरोधात बोलताना दिसला आहे. मात्र, यावेळी अभिनेता उर्फीबद्दल असं काही बोलला आहे की सगळेच थक्क झाले आहेत.

तर झाले असे की, नुकतेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फैजान अन्सारी म्हणाला, उर्फी जावेद ट्रांसजेंडर आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याजवळ सबळ पुरावे आहेत, ज्याच्या आधारे मी देशासमोर मोठा खुलासा करणार आहे. माझा तिच्याशी आधीच बराच वाद आहे, जाे उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अशात मी उर्फी काय आहे? हे  पुरावे, साक्षीदारसह ट्रांसजेंडर समाजाच्या प्रमुख आणि हायकोर्टासमाेर सिद्ध करणार आहे.

फैजान अन्सारीने मीडियाशी संवाद साधताना पुढे सांगितले की, ‘माझ्या टीमने उर्फीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण उर्फी सगळ्यांसोबत खूप उद्धटपणे वागते. मुस्लीम समाजाशी तिचा काहीही संबंध नाही, असे तिचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मला तिच्याशी बाेलणे व्यर्थ वाटते. तिला थेट धडा शिकवणेच योग्य राहिण. मुस्लीम असूनही ती आमच्या नावाची अशी बदनामी करत आहे, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे तिचे सत्य लवकरात लवकर लोकांसमोर यावे आणि तिने ट्रांसजेंडर समाजात सामील व्हावे, अशी माझी इच्छा आहे. फैजान अन्सारीचा हा खुलासा ऐकून सर्वांचेच कान टवकारले आहेत. अशात त्याच्या बोलण्याचा उर्फीवर काय परिणाम होतो आणि ती कशी प्रतिक्रिया देते हे पाहणे मनोरंजक ठरेल.(tv actress uorfi javed is kinnar faizan ansari makes shocking claims about actress gender says should surrender herself)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खरे की काय? गुपचूप लग्न केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला बाबा? दोन महिन्याचे झाले बाळ

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

हे देखील वाचा