Wednesday, July 3, 2024

प्रभास स्टारर ‘छत्रपती’च्या हिंदी रिमेकचा ट्रेलर रिलीज, ‘हा’ साऊथ अभिनेता करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण

एसएस राजामौली यांचा तेलुगू चित्रपट ‘छत्रपती’चा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला आहे, ज्याचा ट्रेलर मंगळवारी (दि. 2 मे)ला प्रदर्शित झाला. या रिमेकची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातून कोणताही हिंदी अभिनेता नसून दक्षिणेतील अभिनेता श्रीनिवास बेल्लमकोंडा हिंदी बॉक्स ऑफिसवर पदार्पण करत आहे.

‘छत्रपती’ चित्रपट 12 मे रोजी देशभरात हिंदीत प्रदर्शित होणार आहे. पॅन स्टुडिओ चित्रपटाचा ट्रेलर हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सने भरलेला आहे. श्रीनिवास व्यतिरिक्त या चित्रपटात नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘छत्रपतीं’ची कथा राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती.

चित्रपटाविषयी श्रीनिवास बेल्लमकोंडा म्हणाले, “छत्रपती हा माझ्यासाठी अनेक अर्थांनी खास चित्रपट आहे. कारण, मी तेलगू चित्रपटात पदार्पण करत असतान व्हीव्ही विनायकने माझ्या चित्रपटाचे दिग्दर्शित केले होते आणि आता ते माझ्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाचे देखील दिग्दर्शक आहेत, ज्यामुळे आमची जोडी खास बनते.”

अभिनेत्री नुसरत भरुचा चित्रपटात काम करण्याविषयी म्हणाली, “श्रीनिवाससोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. तो पडद्यावर खूप नेचरल दिसतो. हा पॅन इंडिया फिल्म संपूर्ण भारताना शिट्ट्या वाजवायला मजबूर करणार आहे.”

निर्माते डॉ. जयंतीलाल गाढा म्हणाले, “छत्रपतींमध्ये संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना आकर्षित करणारे घटक आहेत. ट्रेलरने याची पुष्टी केली आहे. प्रेक्षकही त्याला भरभरून प्रेम देतील अशी आशा आहे.” दिग्दर्शक व्ही व्ही विनायक म्हणाले, “श्रीनिवास बेल्लमकोंडा हा एक आइडियल कमर्शियल हीरो आहे, जे काही हाय-ऑक्टेन अॅक्शन आणि स्टंट आहेत ते ताे अगदी सहजतेने करतो. त्याची ही उत्स्फूर्तता पडद्यावर दिसते.”

श्रीनिवास बेल्लमकोंडा हा तेलगू निर्माता सुरेश बेल्लमकोंडा यांचा मुलगा आहे. श्रीनिवासने 2014मध्ये ‘अल्लुडू सीनू’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. ‘छत्रपती’ हा त्यांचा दहावा चित्रपट आहे.

मंडळी, तेलुगु चित्रपट ‘छत्रपती’ 2005मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रभाससोबत श्रिया सरन मुख्य भूमिकेत होती. ही कथा दोन सावत्र भावांच्या द्वेषावर आधारित आहे. विशेष बाब म्हणजे छत्रपतींचे संगीत आरआरआरसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या एमएम कीरावानी यांनी दिले आहे.(chatrapathi trailer tollywood prabhas rajamouli film hindi remake marks srinivas bellamkonda debut with nushrat bharuccha )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांच्या ‘ललका टी-शर्टवा’ गाण्याने घातला धुमाकूळ

भाईजानने अरबाज अन् साेहेलच्या घटस्फाेटाची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘तो पूर्वी माझे ऐकत नव्हता, पण’

हे देखील वाचा