Friday, November 15, 2024
Home भोजपूरी खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांच्या ‘ललका टी-शर्टवा’ गाण्याने घातला धुमाकूळ

खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांच्या ‘ललका टी-शर्टवा’ गाण्याने घातला धुमाकूळ

भोजपुरी गाण्यांना मधल्या काही काळापासून सुगीचे दिवस आले आहे. या गाण्यांना भोजपुरी प्रेक्षकांसह इतर लोकं देखील मोठी पसंती दर्शवतात. भोजपुरीमधील कलाकारांना देखील पॅन इंडिया ओळख आहे. अशातच आता एका नवीन भोजपुरी गाण्याने एकच धुमाकूळ घातला आहे. भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि यामिनी सिंग यांचे ‘ललका टी-शर्टवा’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, याला प्रेक्षकांनी अमाप प्रतिसाद दिला आहे.

‘ललका टी-शर्टवा’ हे गाणे यूटुबवर प्रदर्शित झाले असून, गाण्यात यामिनी सिंग आणि खेसारी लाल यादव यांची जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे गाणे खेसारी लाल आणि शिल्पी राज यांनी गायले असून, ‘ललका टी-शर्टवा’ हे गाणे अन्नपूर्णा फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले गेले आहे. गाण्यात खेसारी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दिसत असून, त्याच्या लाल रंगाच्या टीशर्टवर यामिनी घायाळ होते असे दाखवले गेले आहे.

‘ललका टी-शर्टवा’ या गाण्याला खेसारी लाल आणि शिल्पी राज यांनी आवाज दिला असून, गाण्याचे शब्द अखिलेश कश्यप यांनी लिहिले आहे. तर संगीत आर्य शर्माने दिले असून, शुभम तिवारीने गाणे कंपोज केले आहे. पुन्हा एकदा या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यूटुबवर तर गाण्याला लोकांनी अमाप प्रतिसाद दिला असून, सतत गाण्याची व्ह्यूज वाढत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा