Saturday, July 6, 2024

‘हा चित्रपट भारतीय नाही…’,छेल्लो शोला ऑस्करसाठी पाठवण्यावरून वाद पेटला

दिग्दर्शक पान नलिन यांचा गुजराती चित्रपट “छेल्लो शो “(द लास्ट शो)(Chhello) ऑस्कर(Oscar) पुरस्कारसाठी पाठवण्यात आला होता. परंतु, हा चित्रपट आता वादात सापडला आहे. आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने या निवडीला अयोग्य म्हणत, चित्रपटाला विरोध केला आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)यांना एक पत्र देखील लिहिण्यात आले आहे. एम्प्लॉइजने म्हटले की, हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही. चित्रपटाच्या निवडीची पद्धत योग्य नसून, परीक्षकांनी त्यावर विचार केला पाहिजे.

ऑस्कर नामांकनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘छेल्लो शो’च्या निवडीची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने केली होती. या चित्रपटाचे इंग्रजी शीर्षक ‘लास्ट फिल्म शो’ असे आहे. हा चित्रपट भारतात 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याचा आरोप
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने या चित्रपटाला केवळ परदेशी चित्रपटच नाही, तर हॉलिवूड चित्रपट ‘सिनेमा पॅराडिसो’चा रिमेक असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र, ही संपूर्ण निवड प्रक्रिया सांभाळणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ही निवड प्रक्रिया पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘छेल्लो शो’ हा चित्रपट ‘सिनेमा पॅराडिसो’पासून प्रेरित असेल, तर हा चित्रपट ऑस्कर निवड फेरीतून बाहेर पडू शकतो.

नेमका वाद काय?
इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी यासंदर्भात एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘ऑस्कर नामांकनासाठी ‘छेल्लो शो’ चित्रपट पाठवणाऱ्या ज्युरींचे अध्यक्ष टीएस नागभरणा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नमूद केले होते की, ‘छेल्लो शो’ गेल्या वर्षीही ऑस्करच्या नामांकनासाठी ज्युरींकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्यामुळे ज्युरींनी हा चित्रपट नाकारला आणि आता स्क्रिनिंग झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा पात्र म्हणून घेण्यात आला होता. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. कोणत्याही चित्रपटाला ऑस्करच्या नामांकनासाठी पाठवण्याचा कालावधी निश्चित केला जातो, म्हणजे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केल्यानंतर तो चित्रपट वर्षभर कोणत्याही पुरस्कार नामांकनात पाठवण्यासाठी पात्र असतो. मात्र, एखाद्या चित्रपटाला एकदा नाकारून, तो पुन्हा ऑस्कर नामांकनासाठी पात्र ठरवणे हे नियमांच्या विरोधात आहे. हे योग्य असेल तर, 10 वर्षे जुने चित्रपटही ऑस्करसाठी पाठवावेत.’

‘छेल्लो शो’ ऑस्करसाठी पाठवणे योग्य नसल्याचे आणखी एक कारण देताना अशोक पंडित म्हणाले की, ‘छल्लो शो’ला ऑस्कर नामांकनासाठी पाठवायला नको होते. कारण, हा चित्रपट पूर्णपणे परदेशी कंपनीने तयार केला होता आणि नंतर हा चित्रपट भारतीय निर्मात्यांना देण्यात आला होता. संपूर्णपणे परदेशी कंपनीने बनवलेला हा चित्रपट भारतीय कसा ठरू शकतो? 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या इटालियन चित्रपट ‘सिनेमा पॅराडिसो’चे पोस्टर आणि ‘छेलो शो’ चित्रपटाचे पोस्टर यांच्यात साम्य दाखवून अशोक पंडित यांनी हा चित्रपट एका अतिशय गाजलेल्या विदेशी चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा केला.

निवड प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण असावे
अशोक पंडित यांनी ‘छेल्लो शो’ला ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, ‘आम्ही माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना तक्रार पत्र लिहून ऑस्कर नामांकनात चित्रपट पाठवण्यासाठीची निवड प्रक्रिया ही फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या हातात नसावी. या निवड प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, जेणेकरून चित्रपटांच्या निवडीमध्ये आणखी गैरप्रकार होणार नाहीत.’

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! ‘तो लग्न करण्यासाठी पैशाची थैली घेवून आला होता…’, रिंकूच्या प्रेमात सैराट झालेल्या चाहत्याचा किस्सा
Death Anniversary : कोरोना काळात गमावलेला जादूई आवाज,एसपी बालसुब्रमण्यम यांच्या नावावर होता ‘हा’ विश्वविक्रम
चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

हे देखील वाचा