Thursday, March 28, 2024

दु:खद! ऑस्कर पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर येत आहे. ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे शुक्रवारी (दि. 23 सप्टेंबर) निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांचे निधन फ्रान्सच्या मोंटडुरस येथील राहत्या घरी झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीच्या निधनाची पुष्टी केली. अभिनेत्रीच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. चाहतेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्री लुईस फ्लेचर (Louise Fletcher) यांचे एजेंट डेव्हिड शॉल यांनी सांगितले की, अभिनेत्री कुटुंबासोबतच राहत होती. त्यांचे निधन झोपेत असतानाच झाले. मात्र, त्यांनी अभिनेत्रीच्या निधनामागील कारण सांगितले नाही. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी त्यांनी त्यांच्या घराबद्दल कुटुंबीयांशी संवाद साधला होता. डेव्हिड म्हणाले की, लुईस यांनी कुटुंबीयांना सांगितले होते की, “मला विश्वास होत नाहीये की, मी आपल्या चांगल्यासाठी एवढं काही बनवले आहे.”

लुईस यांची यशस्वी अभिनय कारकीर्द तब्बल 60 पेक्षा जास्त वर्षे चालली. त्यांनी टीव्ही आणि सिनेसृष्टी दोन्ही इंडस्ट्रीत चांगली लोकप्रियता मिळवली. त्यांनी या दोन्ही पडद्यांवर अविस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. लुईस यांनी सन 1996मध्ये आलेल्या ‘पिकेट फेन्सेस’ आणि 2004मधील ‘जॉन ऑफ आर्काडिया’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या दोन्ही सिनेमांसाठी त्यांना ऍमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लुईस यांनी 1975मध्ये आलेल्या ‘वन फ्लेव ओव्हर द कुकू नेस्ट’मध्ये नर्स रॅच्डची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना ऑस्कर पुरस्कार जिंकून दिला होता.

हॉलिवूडला दिला खतरनाक खलनायक
लुईस फ्लेचर यांच्या या भूमिकेने हॉलिवूडला आतापर्यंतचा सर्वात खतरनाक खलनायक दिला. त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 1950च्या दशकाच्या शेवटी ‘लॉमॅन’, ‘बॅट मास्टर्सन’, ‘मॅव्हरिक’, ‘द अनटचेबल्स’ आणि ’77 सनसेट स्ट्रिप’ यांसारख्या टीव्ही शोमधून केली होती. त्यांचा जन्म 22 जुलै, 1934 मध्ये बर्मिंघम, अलबामा येथे झाला होता. महत्त्वाची माहिती अशी की, त्यांच्या आई-वडिलांना ऐकू येत नव्हते.

अभिनेत्री लुईस फ्लेचर यांच्या निधनामुळे कलाविश्व दु:खाच्या सागरात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेमादिनाला ‘ब्रम्हास्त्र’ची बंपर कमाई, इतर चित्रपटांच्या कमाईचे आकडे पाहुन व्हाल थक्क
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले
म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?

हे देखील वाचा