झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ या मालिकेतील सगळेच अव्वल कलाकार आहेत. मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. दोन नावाजलेले कलाकार आहेत म्हणजे मालिका हिट होणार
यात सुरुवातीपासूनच काही वाद नव्हता. परंतु मालिकेत आणखी एक अशी कलाकार आहे, जिने प्रोमोपासून सगळ्यांच्या मनावर राज्य केले. ती म्हणजे मायरा वैकुळ. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मायराच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती ‘पांडू’ चित्रपटातील ‘केळेवाली’ या गाण्यावर डान्स करत आहे. खास गोष्ट म्हणजे ती सोनाली कुलकर्णीप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (child actor myra vaikul dance video viral on social media)
अनेकजण या छोट्या केळेवालीच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. तिने “कसलं भारी,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत अनेकांना तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. मायराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु तिचा हा व्हिडिओ सगळ्यांना खास आवडला आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते, तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. मालिकेत आता रंजक वळण आले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा :
वयाच्या १६ व्या वर्षी केली मॉडेलिंगमधून सुरुवात, दीपिका पदुकोण आज आहे निर्मिती क्षेत्रात कार्यरत