दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस ‘बाल दिन‘ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस, विशेषत: मुलांना समर्पित, या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. त्यांना प्रेमाने सगळे चाचा नेहरू असेही म्हणायचे. चाचा नेहरूंना लहान मुले खूप आवडायची. म्हणूनच त्यांच्या वाढदिवशी बाल दिन साजरा केला जातो. ‘बाल दिना’च्या निमित्ताने प्रत्येक पालक आपल्या मुलांना खास वाटावे यासाठी अनेक योजना बनवणातात. लहान मुलांचे जीवन दाखवणारे असे अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये बनले आहेत, जे मुलांना प्रेरणा देतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडच्या अशाच काही चित्रपटांबद्दल…
तारे जमीन पर(2007)
2007 मध्ये आलेला आमिर खान(Amir Khan) स्टारर चित्रपट ‘तारे जमीन पर’ लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून लहान मुलांशी निगडीत गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अशा मुलांबद्दल दाखवण्यात आले होते जे अभ्यासात कमकुवत असतात पण अतिशय सर्जनशील असतात. अमोल गुप्ते आणि आमिर खान दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट मुलांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. प्रत्येक मूल खास असते, प्रत्येकात काहीतरी खास असते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ही कथा एका डिस्लेक्सिया आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाची आहे, जो अभ्यासात कमकुवत आहे आणि त्याला नेहमीच फटकारले जाते. परंतु, तो खूप चांगला चित्रकार आहे. त्याचे एक शिक्षक त्याला त्याची खरी ताकद ओळखण्यात मदत करतात. हा चित्रपट खूप काही शिकवून जाणारा आहे.
मासूम (1983)
1983 चा चित्रपट एका भावनिक विषयावर आधारित होता ज्यामध्ये निष्पाप मुलांचा समावेश होता. दत्तक मुलांच्या समस्यांवर आधारित या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, सुप्रिया पाठक आणि जुगल हंसराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील ‘लकडी की काठी’ हे प्रसिद्ध गाणे आजही मुलांना खूप आवडते.
आय अॅम कलाम(2010)
नील माधव पांडा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘आय अॅम कलाम’ हा चित्रपट प्रत्येक लहान मुलाला त्यांच्या पालकांनी दाखवलाच पाहिजे. ही एका अशा मुलाची गोष्ट आहे, ज्याला इंग्रजी शिकायचे आहे, शाळेत जायचे आहे आणि आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी मोठा माणूस बनण्याची इच्छा आहे. हा चित्रपट लहान मुलांसह मोठ्यांसाठी देखील प्रेरणादायी आहे.
चेन कुली की मेनकुली(2007)
या चित्रपटात अनाथ आश्रमात राहणाऱ्या आणि क्रिकेटर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका छोट्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. हातात मिळेल त्या गोष्टीने क्रिकेट खेळणाऱ्या या मुलाला एक दिवशी अनाथ आश्रमात आलेल्या खेळण्यांमध्ये एक बॅट सापडते आणि ही बॅट त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते.
चिल्लर पार्टी (2011)
2011 चा हा चित्रपट लहान मुलांवर आधारित कौटुंबिक नाटक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी आणि विकास बहल यांनी केले होते. चित्रपटात मुलांचा एक गट दाखवण्यात आला आहे. ही सर्व मुले अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी अनाथ आहेत. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.(childrens day 2022 special movies must watch these movies on 14th november)
हेही वाचा-
–‘…आणि हे मराठी कलाकार’, टीका करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली…
–‘पुढचा प्रवास खडतर असेल, तर…’, म्हणत अमेय वाघने वाढदिवशी स्वतःलाच दिलेली ‘ही’ खास भेट