आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघ सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघात बदल झाले होते. सिनियर खेळाडूंच्या निवृत्ती नंतर संघाची धुरा नव्या दमाच्या खेळाडूंच्या हातात आली आहे.
संघाचा कर्णधार सुर्याकुमार यादव झाला असून त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी ट्वेन्टी मालिका खेळला. या मालिकेतले तीनही सामने भारतीय संघ जिंकला आणि मालिका आपल्या नावावर केली. त्यातील शेवटचा सामना तर एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हता. यातील विजायामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) भारावून गेला आहे.
चिन्मयने त्याच्या सोशल मिडीयावर सुर्याकुमार यादव साठी एक पोस्ट टाकली आहे. यात तो सूर्याची प्रशंसा करताना दिसत आहे. सुर्याकुमार यादवचा एक फोटो शेयर करत चिन्मयने लिहिले की, तू भविष्यात एक उत्कृष्ट कर्णधार होऊ शकतोस, याची काल आम्हाला एक झलक दाखवलीस. श्रीलंकेविरुद्ध सूर्याने संघाचे जबरदस्त नेतृत्त्व केले.
कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर १३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. श्रीलंकेने धावांचा चांगला पाठलाग केला आणि १५ षटकांत १०७ वर २ असा स्कोअर केला. इथून श्रीलंका पराभूत होईल असे कुणालाच वाटले नव्हते. पण भारताने इथूनच सामना फिरवला आणि पुढील ३० चेंडूंत श्रीलंकेला २९ धावाच करू दिल्या आणि सामना टाय सोडवला. सुपर ओवर मध्ये भारताने विजय मिळवत मालिका ३ – ० ने जिंकली
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘तुझं तोंड मी खलबत्याने ठेचेल’, बिग बॉसच्या घरात निक्कीचा अंकीतावर हल्ला !
“३५ वर्षे सत्तेत असलेला आमदार मी पाडला”. छोट्या नेत्याचा बिग बॉस मध्ये मोठा दावा