Monday, December 9, 2024
Home मराठी “३५ वर्षे सत्तेत असलेला आमदार मी पाडला”. छोट्या नेत्याचा बिग बॉस मध्ये मोठा दावा

“३५ वर्षे सत्तेत असलेला आमदार मी पाडला”. छोट्या नेत्याचा बिग बॉस मध्ये मोठा दावा

अनेक सरप्रायजेस घेऊन ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझन मध्ये अनेक नवनवीन गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. या सिझन मध्ये वर्षा उसगावकर, निखील दामले, अंकिता वालावलकर,पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजित सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार’ सुरज चव्हाण इत्यादी सदस्यांनी भाग घेतला आहे.

या सर्वांमध्ये छोटा पुढारी घनश्याम दरवडेला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.आपल्या रोखठोक भाषणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा छोटा पुढारी इथेही आकर्षण केंद्र ठरला आहे. बिग बॉसच्या घरात येताच घनश्यामने एक मोठे वक्तव्य केले आहे.

पहिल्याच दिवशी घनश्यामने त्याच्यामुळे ३५ वर्ष सत्तेत असलेला आमदार पडल्याच्या दावा केला आहे. बिग बॉस सदस्यांशी बोलताना तो म्हणाला कि “३५ वर्ष सत्तेत असलेला आमदार माझ्या एका भाषणामुळे पडला”

घनश्याम म्हणाला कि, मी जनतेचा पुढारी आहे. माझ्यामुळे आमच्याच तालुक्यातला एक आमदार पडला. माझं भाषण झालं. लोकांना ते भाषण इतकं आवडलं कि मिडीयाने ते उचलून धरलं. ३५ वर्षे सत्तेत असलेल्या आमदाराला चिमुकल्याने पाडलं, असं म्हटलं गेलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी त्याला विचारलं कि मग काय झालं ? त्यावर त्याने उत्तर दिलं की त्यामुळे गावात रस्ता आला, पाणी आलं. विकास झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

न्यूयॉर्कमध्ये एकटी फिरायला गेली ऐश्वर्या राय बच्चन; युजर्स म्हणले, ‘तिचा नवरा…’
जरीन खान घर सोडण्यास घाबरत होती, कतरिनाशी तुलना केल्याने झाले असे परिणाम

हे देखील वाचा