Wednesday, June 26, 2024

चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’मध्ये सलमानची जबरदस्त एन्ट्री, विवेक ओबेराॅयच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, अमिताभ बच्चन यांसारख्या स्टार्सनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील दबंग सलमान खान  यानेही अखेर तेलुगू चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवीसोबत ‘गॉड फादर’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर शनिवारी (दि.1 ऑक्टाेबर) ला मुंबईत लाँच करण्यात आला. यादरम्यान सलमानने अनेक खुलासे केले. 

साऊथ सिनेमाचा एक भाग बनून सलमान खान(Salman khan) खूप खूश दिसत होता. त्याने ‘गॉड फादर’ची शूटिंगही खूप एन्जॉय केली. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला एक काम खूप आव्हानात्मक वाटले. सलमान खान म्हणाला, “बाय द वे, चित्रपटातील माझे संवाद हिंदीत आहेत. पण मला तिथल्या भाषेत एक ओळीचा संवाद बोलायचा होता जे माझ्यासाठी खूप माेठं आव्हान होते.”

‘गॉड फादर’ हा एक तेलुगू चित्रपट आहे.जो इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सुपरस्टार मामूट्टी आणि विवेक ओबेरॉय यांचा ‘लुसिफर’ चित्रपटावर आधारित आहे. नेटफ्लिक्सने नुकतेच ‘लुसिफर’च्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत.

जेव्हा-जेव्हा एखादा साऊथ स्टार त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबईत येतो. त्यावेळी त्याला साऊथ विरुद्ध बॉलिवूड या मुद्द्यावर प्रश्न विचारला जाताे? या प्रश्नाच्या उत्तरात चिरंजीवी म्हणाले की, आमचा सिनेमा एक आहे. साऊथचा प्रेक्षक असो किंवा हिंदी सिनेमा, प्रत्येकाच्या भावना सारख्याच आहेत. यावर सलमान खान म्हणाला, ‘बॉलिवूड, टॉलीवूड असे कितीक नाव मीडियाने दिली आहे. पण आमचा चित्रपट हा भारतीय चित्रपट आहे आणि परदेशात आमचा चित्रपट भारतीय चित्रपट म्हणूनच ओळखले जातात.

हॉलिवूडच्या मुद्द्यावर बाेलताना सलमान म्हणाला, ‘आमच्या इथल्या लोकांना हॉलिवूड चित्रपटात काम करायचे आहे. पण, मला साऊथच्या चित्रपटांमध्ये सहभागी होऊन तीन हजार कोटी ते चार हजार कोटी कमवायचे आहेत. बॉलिवूडमध्ये राहून तीनशे कोटींची कमाई तर खूपदा केली आहे. ‘गॉड फादर’मध्ये काम करण्यासाठी सलमानने काेणतीही फी घेतली नाही. त्यांनी चिरंजीवीवरील प्रेमामुळे चित्रपटात काम केले आहे.

‘गॉड फादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा यांनी केले आहे. सलमान खान या चित्रपटात दीर्घ भूमिका साकरत आहे. याव्यतिरिक्त पुरी जगन्नाथ यांनीही ‘गॉड फादर’मध्ये पत्रकाराची भूमिका साकारली आहे. ‘गॉड फादर’ हा चित्रपट या शुक्रवारी म्हणजेच 5 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
याला काय अर्थय! ऋतिक- सैफच्या ‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन अक्षयच्या फ्लॉप सिनेमांपेक्षाही कमी, फक्त…
कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा