Wednesday, April 16, 2025
Home टेलिव्हिजन ‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या….

‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या….

हिंदी मालिकाविश्वातील आपल्या अतरंगी कपड्यांमुळे सतत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. मागील काही दिवसांपासून तिच्यात आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात सुरु असणाऱ्या वादामुळे उर्फी चांगलीच गाजताना दिसत आहे. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध चालू आहे. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. नेहमीच सार्वजनिक ठिकाणी, भर रस्त्यावर विचित्र कपडे घालून येणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून तिला अटक करण्याची मागणी केली. याला उर्फीने देखील तिच्या स्टाइलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.

हे सगळं सुरु असताना उर्फीने चित्रा वाघ यांची खिल्ली उडवणारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. उर्फीने एक फोटो ट्वीट केला आणि त्याला चित्रा वाघ यांना टॅग करत लिहिले, “लेकिन अभी बोहोत सुधार बाकी है. सॉरी चित्रा वाघ जी. आय लव्ह यू.” तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये तिने, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू,” आता त्यावर चित्रा वाघ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तुळजापूरमध्ये बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, “मला आता याबद्दल काहीही बोलायचे नाही. तिने शब्दांची कितीही काहीही मोडतोड करत लिहिले तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे. तुम्ही तुमच्या चार भितींच्या आतमध्ये काय करता, हा तुमचा प्रश्न आहे. पण, सार्वजनिक ठिकाणी आणि समाजात असल्यावर तुम्हाला कपड्यांचे भान पाहिजे. इतर मुली जीन्स, टॉप्स, फ्रॉक घालतात. त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. मात्र ही बाई नंगानाच करत आहे. काल कोणतरी म्हटले कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. सगळ्या अ‍ॅलर्जीच्या गोळ्या आमच्याकडे उपलब्ध आहे.”

आता या वादानंतर अनेकांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे तर काहींनी चित्रा वाघ यांना बरोबर म्हटले आहे. आता या वादात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा