Thursday, April 18, 2024

‘दीपवीर’ने करण देओल अन् द्रिशा आचार्यच्या रिसेप्शनमध्ये लावले जाेरदार ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड स्टार्स माेठ्या प्रमाणात उपस्थित हाेते. सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत करणच्या रिसेप्शनमध्ये दिसले. याशिवाय करण याच्या रिसेप्शन पार्टीत रंगत आणण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा आणि प्रेम चोप्रासारखे दिग्गज स्टार्सही उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग देखील रात्री उशिरा का हाेईना, पण करण याच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते. तिथे जाऊन त्यांनी या जोडप्याचे अभिनंदन तर केलेच, पण डान्स करून पार्टीत चार चांद लावले.

करण देओल (karan deol) याच्या रिसेप्शन पार्टीचे फाेटाे सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्टीमध्ये दीपिका पदुकोण काळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसली, तर रणवीर सिंग पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान करून रिसेप्शनला पोहोचला. अशात पार्टीत पती-पत्नी दोघांचा लूक आणि स्टाइल पाहण्याजोगी होती. महत्वाचे म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी करण आणि द्रिशाला मिठी मारून लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.

अशात करण याच्या रिसेप्शनमध्ये दीपिका आणि रणवीर यांचा लूक पाहुण चाहते कौतुक करताना दिसले. एका युजरने दीपिकाची स्तुती करत लिहिले की, ‘काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे., तर दुसर्‍या युजरने रणवीर सिंगचे कौतुक करत लिहिले की, “रणवीर कोणत्याही लूकमध्ये रॉक करू शकतो. या साध्या शेरवानीमध्येही तो डॅशिंग दिसत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केल्यानंतर लग्न केले. लग्नानंतर सनी देओलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “आज मला मुलगी झाली. तुम्हा दोघांना माझा आशीर्वाद.” (bollywood actress deepika padukone ranveer singh step at karan deol drisha acharya reception dance with couple video )

अधिक वाचा-
‘जलेगी भी तेरी बाप की’, हनुमानाच्या तोंडून हा डायलॉग ऐकून थक्क झालेत सुनील लहरी; म्हणाले, ‘अत्यंत लज्जास्पद…’

‘एक ब्राही खरेदी करता आली नाही…’ नाेरा फतेहीला का केले जात आहे ट्राेल? लगेच वाचा

हे देखील वाचा