Wednesday, June 26, 2024

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्या आईने घेतला अखेरचा श्वास

मागील दोन वर्षांपासून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला आहे. नुकतेच प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले होते. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावर यांची आई पुरन दावर यांचे गुरुवारी (२३ सप्टेंबर) सकाळी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असे म्हटले जात आहे की, मागील काही काळापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. पुरन दावर यांच्या निधनानंतर कलाकार सोशल मीडियामार्फत शोक व्यक्त करत आहेत.

व्हायरल भयानीने सोशल मीडियावरून श्यामक दावर यांच्या आईच्या निधनाची माहिती दिली. त्याने श्यामक आणि त्यांच्या आईचा फोटो शेअर करत लिहिले की, “श्यामक यांची आई पुरन दावर यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे. आज सकाळी आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. #shimakdavar आणि त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना.” (Choreographer Shimak Davars Mother Puran Davar Dies At The Age of 99 Celebs Expressed Their Feelings)

व्हायरल भयानीच्या या पोस्टवर अभिनेत्री दिया मिर्झा, रश्मी देसाई, ईशा कोप्पीकर यांनी हात जोडतानाचे इमोजी पोस्ट करत पुरन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

श्यामक दावर हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरपैकी एक आहेत. त्यांना भारतात डान्स क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ओळखले जाते. श्यामक यांना ‘समकालीन डान्स मास्टर’ म्हणूनही ओळखले जाते.

श्यामक दावर यांना ‘दिल तो पागल है’मध्ये काम करण्यासाठी सन १९९७ मध्ये सर्वोत्तम कोरिओग्राफरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांना जुलै २०११ मध्ये भारत आणि जगभरात मनोरंजनात त्यांच्या योगदानासाठी मिडलसेक्स विद्यापीठातून डॉक्टरेटची मानद उपाधीही देण्यात आली होती.

त्यांनी ‘लाल’, ‘किसना’, ‘बंटी और बबली’, ‘धूम २’, ‘आय सी यू’, ‘तारे जमीन पर’, ‘युवराज’, ‘रब ने बना दी जोडी’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘जग्गा जासूस’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी कोरिओग्राफीचे काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

-फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

-‘बालिका वधू’ फेम अविकाचा दिसला बिकिनी अवतार, फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

हे देखील वाचा