Tuesday, April 23, 2024

अखेर बाटला हाऊस फेम ‘या’ अभिनेत्रीची अं’मली पदार्थ केसमध्ये दुबई पोलिसांनी केली निर्दोष सुटका

‘सडक 2’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी क्रिसन परेरा सर्वांना ठाऊकच आहे. काही दिवसापूर्वीच तिच्याबाबतीत एक बातमी समोर आली होती, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता. क्रिसनला यूएई पोलिसांनी अं’मली पदार्थांच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र आता बातमी येत आहे की, तिची जेलमधून सुटका झाली आहे. क्रिसनचा भाऊ असणाऱ्या केविन परेराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिसन शारजाह जेलमधून बाहेर आल्यानंतर तिच्या कुटुंबाशी बोलताना करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chrisann Pereira (@chrisannpereira)

केविन परेराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिसन व्हिडिओ कॉलवर तिच्या आईशी बोलताना दिसत आहे. मुलीसोबत बोलताना तिच्या आईला झालेला आनंद या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. केविन हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “क्रिसन आता स्वतंत्र आहे!!! पुढच्या ४८ तासांमध्ये ती भारतात असेल.” या व्हिडिओमध्ये क्रिसन, तिची आई आणि इतर कुटुंबातील सदस्य दिसत असून, सर्वच तिची सुखरूप सुटका झाल्यामुळे आनंदित आहे. शिवाय सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू देखील दिसत आहे.

दरम्यान क्रिसन परेराला १ एप्रिल रोजी दुबई येथील शारजाह एयरपोर्टवर अटक करण्यात आली होती. मुंबई क्राइम ब्रांचला नंतर समजले की. एका कुत्र्यावरून झालेल्या भांडणामुळे एका बेकरी मालकाने बदल घेण्याच्या इराद्याने अभिनेत्रीला यात अडकवले होते. पोलिसांनी बेकारीचा मालक असणाऱ्या अँथनी पॉलला आणि एका बँकेत असिस्टंट असणाऱ्या राजेश बोभाटला अटक केली आहे. राजेशनेच अंथोनीला क्रिसनला अडकवण्यासाठी मदत केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा