Friday, July 5, 2024

मोठी बातमी! ‘बेबो’विरुद्ध तक्रार दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी ‘बेबो’ म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची सहलेखिका आदिती शाह यांनी करीनाच्या प्रेग्नंसीवर एक पुस्तक लिहिले आहे. ‘करीना कपूर खान्स ‘प्रेग्नंसी बायबल’ या नावाचे पुस्तक त्यांनी प्रदर्शित केले आहे. परंतु या पुस्तकामुळे आता चांगलाच वाद उभा राहिला आहे. कारण या पुस्तकातील बायबल या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही तक्रार अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने दाखल केली आहे. त्यांनी बिड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.

अल्फा ओमेगा यांनी करीना कपूर खानवर आरोप लावले आहेत की, ख्रिश्चन धर्मियांचा ‘बायबल’ हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे, तरीही तिने तिच्या पुस्तकात ‘बायबल’ या शब्दाचा प्रयोग केला आहे. तिने तो शब्द काढावा ही मागणी केली आहे. तसेच त्यांनी करीना कपूर खानवर धार्मिक भावना दुखावल्यामुळे कलम 295-A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

तसेच करीना कपूर खान, आदिती शाह आणि पुस्तकाच्या प्रकाशकांनी ख्रिश्चन समाजाची माफी मागावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केली आहे. (Christian organization accused Kareena Kapoor khan of hurting religious sentiments compliant filled)

दोन मुलांची आई झाल्यानंतर करीना आजही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असते. तिने काही दिवसांपूर्वी तिचे पहिलेच ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल’ या पुस्तकाचे कव्हर पेज लॉन्च केले होते. यानंतर ऍमेझॉनमधील प्रथम क्रमांकाचा बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक ट्रेडिंग होते. पण नंतर या पुस्तकाच्या नावावरून खूप वाद उभे राहिले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा