Sunday, January 18, 2026
Home टेलिव्हिजन CID | लोकप्रिय शोच्या कलाकारांनी केला छोटा ‘गेट-टूगेदर’, फोटो पाहून तुम्हालाही आठवतील जुने दिवस

CID | लोकप्रिय शोच्या कलाकारांनी केला छोटा ‘गेट-टूगेदर’, फोटो पाहून तुम्हालाही आठवतील जुने दिवस

‘दया कुछ तो गडबड है’ आणि ‘दया दरवाजा तोड़ दो’ सारखे डायलॉग तुम्हाला आठवत असतीलच. होय, आम्ही बोलत आहोत सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘सीआयडी’ या लोकप्रिय टीव्ही शोबद्दल, ज्याने छोट्या पडद्यावर दीर्घकाळ राज्य केले. हा शो सोनी टीव्हीवर एक-दोन वर्षे नाही, तर तब्बल २० वर्षे प्रसारित झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याचे डायलॉग आजही चाहत्यांच्या जीभेवर असतात. खास बाब म्हणजे, शो संपला तरी त्यांच्या स्टारकास्टमधील मैत्री संपलेली नाही.

अलीकडेच, शोची लोकप्रिय कलाकार फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. तारिका म्हणजेच श्रद्धा मुसळे (Shraddha Musale) हिने तिच्या घरी सीआयडीच्या कलाकारांसोबत गेट-टूगेदर केले. जिथे शोच्या सर्व कलाकारांनी हजेरी लावली. या इव्हनिंग पार्टीत सहभागी झालेल्यांच्या यादीत दयानंद शेट्टी (दया) आदित्य श्रीवास्तव (अभिजीत), दिनेश फडणीस (फ्रेडरिक) सामील झाले होते. इतकेच नाही, तर सब-इन्स्पेक्टर श्रेयाची भूमिका साकारणारी जान्हवी छेडा, इन्स्पेक्टर अभिमन्यूची भूमिका साकारणारा ऋषिकेश पांडे, सब-इन्स्पेक्टर पंकजच्या भूमिकेतील अजय नागरथ देखील या गेट-टूगेदरमध्ये सामील झाले होते. (cid casts reunion party photos viral)

अजय नागरथने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे सगळे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकजण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. चविष्ट जेवणापासून ते डान्सपर्यंत, प्रत्येकाने खूप मजा केली आणि त्यांचे फोटो याचा पुरावा आहेत. ‘सीआयडी’च्या कलाकारांना एकत्र पाहणे, त्यांच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच! या कलाकारांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा