Thursday, June 1, 2023

KKK 12 | धोक्यांशी लढण्यासाठी सर्वाधिक फी घेतेय जन्नत झुबेर, जाणून घ्या आहे कोण कोणाच्या पुढे

स्टंट रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन १२’ तुफान चर्चेत असतो. हा शो लवकरच टीव्हीवर सुरू होणार आहे. शोचा होस्ट रोहित शेट्टी (Rohit Shetty) स्पर्धकांसह केपटाऊनमध्ये शूटिंग करत आहे. या शोमध्ये सहभागींना खूप वेगवेगळे टास्क दिले जातात. या शोचे अनेक प्रोमो आले आहेत, ज्यांना खूप पसंत केले जात आहे. यावेळीही या शोमध्ये टीव्ही जगतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहेत. सध्या शोमधील महिला स्पर्धकांच्या फीची चर्चा आहे.

‘खतरों के खिलाडी’च्या शेवटच्या सीझनमध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या (Divyanka Tripathi) कमाईची खूप चर्चा झाली होती. रिपोर्ट्सनुसार, ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये तिला दर आठवड्याला १० लाख रुपये मिळत होते. यावेळी अभिनेत्री जन्नत झुबेर (Jannat Zubair) तिला स्पर्धा देताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, शोच्या या सीझनमध्ये जन्नत झुबेरला सर्वाधिक फी मिळत आहे. या शोमधील महिला स्पर्धक किती फी घेतात, ते जाणून घेऊया. (khatron ke khiladi season 12 female contestants fee charges)

जन्नत झुबेर
रिपोर्ट्सनुसार, जन्नत झुबेर ‘खतरों के खिलाडी १२’ मधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे. ‘खतरों के खिलाडी १२’साठी जन्नतला प्रति एपिसोड १८ लाख रुपये मिळत असल्याची बातमी आहे. जन्नत ‘फुलवा’, ‘मेरी आवाज ही पहचान है’, ‘तू आशिकी’ आणि ‘आपके आ जाने से’ या लोकप्रिय टीव्ही शोसाठी ओळखली जाते. जन्नत झुबेरनंतर फैसल सर्वाधिक फी घेत आहे. या शोमध्ये एका एपिसोडसाठी तो १७ लाख रुपये घेत आहे.

रुबिना दिलैक (Rubina Dilaik)
रुबिना दिलैक या रियॅलिटी शोमुळे खूप चर्चेत आहे. फीबद्दल बोलायचे झाले, तर रुबिना दिलैक शोसाठी दर आठवड्याला १०-१५ लाख रुपये घेत असल्याचे बोलले जात आहे. रुबिना ‘बिग बॉस १४’ मधील सर्वात चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे. तिने पती अभिनव शुक्लासोबत या शोमध्ये भाग घेतला होता. तसेच ती या सीझनची विजेती होती. ‘छोटी बहू’ या लोकप्रिय शोमध्ये राधिकाची भूमिका साकारून रुबीना प्रसिद्धीझोतात आली. आता ‘KKK12’ मध्ये

शिवांगी जोशी (Shivangi Joshi)
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीही ‘खतरों के खिलाडी १२’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार, रुबिनाप्रमाणे शिवांगीलाही शोसाठी दर आठवड्याला १०-१५ लाख रुपये मिळत आहेत. शिवांगी जोशी ‘ये है आशिकी’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमधील नायराच्या भूमिकेतून शिवांगीला खरी ओळख मिळाली. यानंतर ती ‘बालिका वधू २’मध्ये दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा