Tuesday, June 6, 2023

लॉकअपनंतर बिग बॉसमध्ये राडा करण्यास अंजली अरोरा सज्ज, निर्मात्यांनी केली घोषणा

कंगना रणौत (Kangana Ranaut) होस्ट केलेल्या OTT शो ‘लॉक अप’ मधून लोकप्रियता मिळवलेली अंजली अरोरा (Anjali Arora) ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी होणार आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ती ‘बिग बॉस 16’ मध्ये तिचा सह-स्पर्धक मुनव्वर फारुकीसोबत सहभागी होणार आहे. या शोमध्ये मुनव्वर आणि अंजलीच्या जोडीची बरीच चर्चा झाली होती.

माध्यमतील वृत्तानुसार, बिग बॉस 16 चे निर्माते अंजली अरोरासोबत चर्चा करत आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर ती या शोचा एक भाग असेल. लॉक-अपमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर अंजली अरोरा आधी अधिक प्रसिद्ध झाली आहे.

अंजली अरोराने व्हिडीओ शेअरिंग ऍप TikTok वर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर अंजली अरोरा यांनी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हायरल कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली, ज्याने लाखो मने जिंकली आहेत.

बिग बॉस 16′ पूर्व बिग बॉस ओटीचा सीझन 2 प्रसारित होर असल्यची चर्चा आहे. अंजलीही येत भागी हो सकटे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ‘BB OTT 2’ होस्ट करणार आहेत. हे दोघेही करण जोहरची जागा घेतील. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु ती जर या शोमध्ये सामील झाली तर शोची रंगत वाढेल यात काही शंका नाही. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा