Sunday, May 19, 2024

सीआयडी फेम ऋषिकेश पांडेसोबत मुंबईत लुटमार, रोख रक्कम आणि आवश्यक कागदपत्र लंपास

सीआयडी या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेत इन्स्पेक्टर सचिनची भूमिका साकारणारा अभिनेता ऋषिकेश पांडे (Hrishikesh Panday) याच्यासोबत लुटमारची घटना समोर आली आहे. बातमीनुसार, मुंबईत अभिनेत्याकडून रोख रक्कम आणि इतर वैयक्तिक सामान लुटण्यात आले. वातानुकूलित बसमधून अभिनेता त्याच्या कुटुंबासह प्रेक्षणीय स्थळांच्या दौऱ्यावर होता. यादरम्यान त्याने स्लिंग बॅगमध्ये ठेवलेले सर्व सामान लुटण्यात आले.

ऋषिकेशच्या म्हणण्यानुसार, ५ जून रोजी तो आणि त्याचे कुटुंब एलिफंटा लेणींना भेट दिल्यानंतर कुलाब्याहून तारदेवला जाण्यासाठी बसमध्ये चढले, तेव्हा ही घटना घडली. याबाबत एका वेबसाईटशी बोलताना अभिनेता म्हणाला, “ही एसी बस होती आणि आम्ही सकाळी ६.३० च्या सुमारास बसमध्ये चढलो. खाली उतरल्यानंतर मी माझी स्लिंग बॅग तपासली आणि माझ्याकडील रोख, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड गायब असल्याचे आढळले. मी या घटनेची कुलाबा पोलीस स्टेशन तसेच मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली.” (cid fame hrishikesh pandey robbed off cash and other documents mumbai)

सीआयडीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा सचिन पुढे म्हणतो की, “मी सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली असल्याने, शोमध्ये लोक आमच्याकडे केसेस घेऊन येतात आणि आम्ही ते कसे सोडवतो, हा एक विनोद झाला आहे. वास्तविक जीवनातही माझ्याकडे लोक माझ्याकडे समस्या घेऊन यायचे आणि मी ते सोडवायला मदत करायचो. पण आता मला लुटले गेले आहे. मला आशा आहे की पोलिस विभाग हे प्रकरण सोडवेल.”

विशेष म्हणजे, ऋषिकेश अलीकडेच त्याच्या CID सहकलाकारांसह गेट टूगेदर पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीदरम्यान दयानंद शेट्टी (सिनियर इन्स्पेक्टर दया), आदित्य श्रीवास्तव (सिनियर इन्स्पेक्टर अभिजीत), दिनेश फडणीस (इन्स्पेक्टर फ्रेड्रिक्स), श्रद्धा मुसळे (डॉ. तारिका), जान्हवी छेडा (इन्स्पेक्टर श्रेया), अजय नागरथ (उपनिरीक्षक पंकज) देखील उपस्थित होते. या रियुनियनचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा