उर्फी जावेद तीच्या ‘फॉलो कर लो यार’ या मालिकेत तीच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. उर्फी तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. अलीकडेच अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘फॉलो कर लो यार’ ही मालिका पाहिली आणि उर्फीचे खूप कौतुक केले.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘फॉलो कर लो यार’ पाहत असलेला एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच समांथाने लिहिले की, स्वतःची खरी ओळख दाखवण्याचे धाडस करणे सोपे नसते. तुमचे आयुष्य उघड्यावर टाकणे तुम्हाला टीका आणि उपहासासाठी खुले करते, परंतु जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला आदर आणि प्रशंसा देखील मिळते.
उर्फीच्या प्रवासाचा आदर करत समंथाने लिहिले की, मला विश्वास आहे की तु नुकतीच सुरुवात केली आहे. पुढे जात राहा. उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर सामंथाची स्तुती केली आणि उत्तर दिले, “समंथा, आता मला असे वाटते की मी संपूर्ण रात्र रडेल!” तुझ्यासारखी स्त्री कधीच भेटली नाही.
२३ ऑगस्टपासून ‘फॉलो कर लो यार’चा प्रवास सुरू झाला. या मालिकेचे एकूण नऊ भाग आहेत आणि ते Amazon Prime Video वर स्ट्रीम केले जाऊ शकतात. उर्फी जावेदने ‘बडे भैया की दुल्हनिया’, मेरी दुर्गी, चंद्रा नंदिनी, ‘दायन’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यासह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ या चित्रपटातही काम केले आहे.
समंथा रुथ प्रभूबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. यात वरुण धवननेही मुख्य भूमिका साकारली आहे. याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले असून त्यांनी ‘द फॅमिली मॅन’चेही दिग्दर्शन केले आहे. त्याची स्ट्रीमिंग ७ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होईल. ही सिरीज अमेरिकन सीरीज ‘सिटाडेल’वर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
ही आहेत या वर्षातील आघाडीची इंग्रजी गाणी; प्रेक्षकांनी दिली आहे भरभरून दाद…