‘क्लासमेट’ फेम पल्लवी पाटीलच्या साडीतील मनमोहक अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा; एक नजर टाकाच


आकर्षक महिलांच्या यादीत दुसरे स्थान मिळवलेल्या पल्लवी पाटीलच्या रूपाचे लाखो चाहते आहेत. या दिवसात ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकली, तर तुम्हाला लक्षात येईल की, ती तिच्या फॅशन स्टेटमेंटबद्दल किती सजग आहे.

पल्लवीच्या अकाउंटवर तुम्हाला अनेक ग्लॅमरस व स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. नुकतेच तिने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे. यातील तिच्या मनमोहक अदा कोणालाही वेड लावणाऱ्या आहेत.

या फोटोमध्ये पल्लवीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच केस मोकळे सोडून तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. यातील तिचा अंदाज चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहेत. तसेच यात तिची सुंदरता पाहून चाहते फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. (classmate fame pallavi patil shared her saree look see here)

पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘क्लासमेट’मधील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. तसेच ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटातील तिचे कामही अतिशय लक्ष वेधून घेणारे होते. पल्लवीने ‘बॉईज २’, ‘ट्रिपल सीट’, ‘तू तिथे असावे’ या चित्रपटातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.