Monday, July 15, 2024

Good News : एकदम खरी बातमी! कॉमेडियन भारती सिंहच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगनम, पती हर्षने दिली माहिती

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती असलेल्या हर्ष लिंबाचियाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारती सिंगने आज ३ एप्रिल २०२२ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हर्षने त्याच्या सोशल मीडियावरून भारतीला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. मागच्या आठवड्यामध्ये भारतीला मुलगी झाल्याच्या बऱ्याच अफवा सोशल मीडिया पसरल्या होत्या, मात्र भारतीने स्वतः या अफवा असल्याचे सांगितले आणि जेव्हा ती आई होईल तेव्हा हर्ष सर्वांनाच ही आनंदाची बातमी देईल असे सांगितले होते. हर्षने सोशल मीडियावर त्या दोघांच्या मॅटर्निटी शूटमधील एक फोटो शेअर करत मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.

भारती सिंगने मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्यावर आणि हर्षवर फॅन्सकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून भारतीने मुलीला जन्म दिला, तिला जुळे मुलं झाले आदी अनेक बातम्या सोशल मीडियावर पसरत होत्या. मात्र आज हर्षने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.

भारती तिच्या प्रेग्नन्सीच्या काळातही खूपच सक्रिय दिसली. यादरम्यान तिने काही रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले. आतादेखील ती एका शोचे सूत्रसंचालन करत होती. तिच्या या कामातील सक्रियतेमुळे तिचे खूपच कौतुक देखील झाले. भारती आणि हर्षने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्युट व्हिडिओ शेअर करत ते लवकरच आईबाबा होणार असल्याची माहिती दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘छैया छैया’ गाणे ठरले होते मलायकाच्या करिअरसाठी मैलाचा दगड, पण या अभिनेत्री होत्या पहिली चॉइस

ऐश्वर्याच्या धमाकेदार गाण्यावर केला अभिषेकने भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

डान्स परफॉर्मन्समध्ये सपना चौधरीला का घालावा लागतो ड्रेस? देसी क्वीनने स्वतः खुलासा केला

हे देखील वाचा