Monday, July 15, 2024

‘छैया छैया’ गाणे ठरले होते मलायकाच्या करिअरसाठी मैलाचा दगड, पण या अभिनेत्री होत्या पहिली चॉइस

जुने ते सोने ही प्रचलित म्हण ९०च्या दशकातील हिंदी चित्रपटातील गाण्यांसाठी चपखलपणे लागू होते. ९० च्या काळातील हिंदी चित्रपट गाणी त्यांमधील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांमधील अभिनेत्रींचा डान्स आणि थेट काळजाला भिडणाऱ्या ओळींमुळे ही गाणी प्रेक्षकांना वेड लावायला लावत होती. यांपैकीच त्या काळात गाजलेले गाणे म्हणजे चल छैय्या छैया. या गाण्याने प्रत्येकालाच त्या काळात नाचायला लावले होते. आजही हे गाणे अनेकांच्या आवडीचे आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या डान्सने चांगलाच धुमाकूळ घातला होता. जितके हे गाणे सुंंदर आहे तितकेच या गाण्याच्या निर्मितीची कथाही रंजक आहे. 

शाहरुख खान आणि मलायका अरोराचे छैय्या छैया हे गाणे आजही लोकप्रिय आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने वेड लावले होते. आजही हे गाणे चर्चेत असते. या गाण्यामुळेच अभिनेत्री मलायका अरोराला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. गाण्यातील मलायकाचा डान्स आणि घायाळ करणाऱ्या अदांनी प्रत्येकाला वेड लावले होते. हे गाणे तिच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले. मात्र ह्या गाण्यात डान्स करण्यासाठी मलायकाला पहिली पसंदी अजिबात नव्हती. तसेच हे गाणे तिला आवडतही नव्हती. याचा खुलासा या गाण्याची कोरिओग्राफर फराह खानने केला होता.

या लोकप्रिय गाण्याच्या आठवणी सांगताना फराह खान म्हणााली होती की, “या धमाकेदार गाण्यासाठी शाहरुख खानसोबत रवीना टंडनला विचारण्यात आले होते पण तिने यासाठी नकार दिला. तसेच शिल्पा शेट्टीलाही विचारण्यात आले होते. मात्र या दोघींनीही गाण्याला नकार दिल्याने हे गाणे मलायकाच्या पदरात येऊन पडले.” मात्र तिला न आवडलेले हे गाणेच तिच्या करिअरसाठी सर्वात मोठी संधी ठरले. या गाण्याने तिला रातोरात स्टार केले. तसेच या गाण्याची आठवण सांगताना रेल्वे स्टेशनमध्ये शूटिंग करण्याची परवानगी न मिळाल्याने रेल्वेवर करावे लागल्याचेही तिने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा