Wednesday, July 3, 2024

Video: ‘असं’ काय झालं की, भारती आणि तिचा पती हर्ष शोच्या सेटवरच लागले रडू?

छोट्या पडद्यावर अनेक रियॅलिटी शो आहेत, जे आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची एकही संधी सोडत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ‘हुनरबाज’ होय. करण जोहर आणि परिणीती चोप्रा हे या शोचे परीक्षक आहेत, तर कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. नुकताच या शोच्या निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये भारती आणि तिचा पती हर्ष रडताना दिसत आहेत. तसेच करण आणि परिणीती त्यांना धीर देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

स्टेजवरच इमोशनल झाले जोडपे
‘हुनरबाज’च्या स्टेजवर एका डान्स ग्रूपने आपल्या डान्स स्टाईलने भारती (Bharti Singh) आणि हर्ष (Harsh Limbachiyaa) या दोघांची लव्हस्टोरी दाखवली होती. त्यामुळे या जोडप्याला रडू कोसळले. कलर्सने अधिकृत इंस्टाग्रााम अकाऊंटवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये भारतीला सुरुवातीला हसताना आणि त्यानंतर भावुक होताना दाखवले. कारण, हुनरबाजने दाखवले की, कशाप्रकारे भारती आणि हर्ष सुरुवातीला मित्र बनले, त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे लग्न केल्यानंतर सर्वोत्तम जोडपे बनले आहेत.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ स्पेशल एपिसोड
आपली लव्ह स्टोरी पाहिल्यानंतर भारती आणि हर्ष खूपच भावुक होतात. दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. व्हिडिओत करण आणि परिणीती दोघेही त्यांना धीर देत गळाभेट घेताना दिसत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या वीकेंडच्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ स्पेशल एपिसोडमध्ये ‘हुनरबाज’ स्टेजवरील फील क्रू भारती आणि हर्षला त्यांचे परफॉर्मन्स देताना दिसतील. शोचा प्रोमो व्हायरल झाला असून प्रेक्षक या प्रोमोवर प्रतिक्रिया देत आहेत. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने कलर्सच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे की, “खूप सुंदर, देव तुम्हा दोघांना नेहमी आनंदी ठेवो.”

लवकरच आई-वडील बनणार आहे जोडपे
भारती आणि हर्षचे लग्न ३ डिसेंबर, २०१७ रोजी झाले होते. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी भारती प्रेग्नंट आहे. त्यामुळे आता भारती आणि हर्ष लवकरच आई-वडील बनणार आहेत. ते सध्या खूपच खुश आहेत. भारती नेहमी आपल्या बेबी बंपसोबत फोटोशूट करत असते. भारतीने सांगितलं होतं की, तिची डिलीव्हरी यावर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे.

भारतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक कॉमेडी शो आणि सिनेमात काम केले आहे. त्यात ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’ आणि ‘खिलाडी ७८६’ यांसारख्या रियॅलिटी शो आणि सिनेमाचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा