अरे व्वा! भारती सिंगच्या घरात हालणार पाळणा? कॉमेडियनच्या ‘त्या’ उत्तरामुळे चर्चांना उधाण


लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) हिने तिच्या अभिनयाने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. एक महिला विनोदवीर म्हणून तिने चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. भारती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. अशातच तिच्याबाबत अशी माहिती समोर आली आहे की, ती सगळ्यांना गोड बातमी देणार आहे. हर्ष आणि भारती लवकरच आई-बाबा होणार आहेत.

तिचे चाहते तिला नेहमीच विचारत असतात की, ती कधी गोड बातमी देणार आहे? या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे की, भारती गरोदर आहे. ती सध्या कुठेही जास्त बाहेर फिरत नाही. तिने सध्या ‘द कपिल शर्मा शो’मधून देखील ब्रेक घेतला आहे, परंतु ती लवकरच शोमध्ये परतणार आहे.

जेव्हा भारतीला याबाबत विचारले, तेव्हा तिने या गोष्टीचा ना स्वीकार केला, ना या गोष्टीला नकार दिला. भारतीने सांगितले की, “मी या गोष्टीला नकार देणार नाही तसेच होकार देखील देणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी सगळ्यांना याबाबत माहिती देणार आहे. मी या गोष्टीला लपवून ठेवणार नाही. मुळात ही लपवून ठेवण्याची गोष्ट नाहीये.” याआधी देखील भारतीने सांगितले होते की, ती आणि हर्ष बेबी प्लॅन करत आहेत. जर आता ही गोष्ट खरी असेल, तर पुढच्या वर्षी भारती आणि हर्ष यांच्या घरात चिमुकल्या पावलांचे आगमन होईल.

हर्ष आणि भारती हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सूत्रसंचालक आहेत. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. त्यांचे कॉमेडी टायमिंग, डायलॉग प्रेक्षकांना खूप आवडतात. यासोबत त्यांच्यातील रोमान्स देखील त्यांचा चाहत्यांना आवडतो. भारतीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आई होण्यासाठी ती तिचे वजन कमी करत आहे. तिने तिचे वजन खूप कमी केले आहे. तिच्याकडे बघून कोणाला विश्वास देखील बसणार नाही की, ती आधीची भारती आहे. तिचे वजन देखील कमी झाल्याने आता सगळ्यांना विश्वास बसू लागला आहे की, ती खरंच गरोदर आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!