अभिनेत्री आणि खासदार असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी शेअर केले त्यांचे थ्रोबॅक बोल्ड आणि मादक फोटो


पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपटांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ अनेकदा त्यांच्या सुंदर फोटो आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असतात. नुसरत स्वतःचे आयुष्य त्यांच्याच अंदाजात जगतात आणि त्यांच्या निर्णयांवर ठाम राहतात. मात्र, काही वेळा त्यांना त्यांच्या विधानांमुळे किंवा फोटोंमुळे ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. विशेषत: सोशल मीडियावर अनेकदा असे घडते, परंतु नुसरत या सर्व गोष्टींचा विचार न करता पुढे जातात. सध्या, त्या त्यांच्या काही फोटोंमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे. त्यांनी बुधवारी (८ डिसेंबर) रोजी संध्याकाळी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हेच फोटो त्यांना ट्रोल करण्यामागचे कारण ठरले आहे.

खरंतर, नुसरत यांनी त्यांचे दोन थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये त्या स्पोर्ट्स ब्रामध्ये मोहक आणि मादक पोज देताना दिसत आहे. या दोन्ही फोटोंसह, नुसरत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “जुन्या फोटोंच्या संग्रहातून.” यासोबतच तिने ‘थ्रोबॅक’ हॅशटॅगही दिला आहे. ज्यावरून हा फोटो जुना असल्याचे दिसून येते. नुसरतला फॉलो करणाऱ्या काही चाहत्यांनीही हे फोटो ओळखून ती म्हातारी झाल्याची प्रतिक्रिया दिली. तिच्या या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहत्यांनी फायर आणि हार्ट इमोजी बनवून नुसरतच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेक कमेंट्समध्ये तिचे कौतुकही करण्यात आले आहे.

मात्र, काही फॉलोअर्सना नुसरतचे असे फोटो आवडले नाहीत. विशेषत: ज्यावेळी सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या आकस्मिक निधनाने देश शोक करीत आहे. यावर त्यांनी कमेंट करत आक्षेप घेतला. युजर्सनी लिहिले की, “त्या खासदार आहेत. असे फोटो पोस्ट करताना त्यांनी हे लक्षात ठेवावे की, देशाच्या सीडीएसचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे.”

नुसरत जहाँ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे यावर्षी सर्वात जास्त चर्चेत होत्या. त्या त्यांचा पहिला पती असणाऱ्या निखिल जैनपासून विभक्त झाल्या आणि यावर्षीच त्या एका मुलाची आई देखील झाल्या आहेत. त्या मुलाचे वडील अभिनेता यश दासगुप्ता असून, नुसरत यांनी त्यांच्या गरोदरपणाबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नव्हते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!