Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर ‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; एक नजर टाकाच

‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; एक नजर टाकाच

हिंदी सिनेसृष्टीतील कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर अजूनही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. त्यांची विनोदी शैली चाहत्यांना प्रचंड आवडते. सिनेसृष्टीत जॉनी लिव्हर यांच्यासारख्या विनोदी शैलीची नक्कल आजवर कोणालाही करता आलेली नाही. हिंदी सिनेमाच्या जगात असे अनेक कलाकार आहेत. जे प्रेक्षकांना हसवतात, पण प्रत्येकाला जॉनी लिव्हर यांच्यासारखी कॉमेडी करता आली नाही. हसायला प्रत्येकाला आवडत असते, पण प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारे जॉनी लिव्हर सोमवारी (14 ऑगस्ट) आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. अशात त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांचा रंजक प्रवास…

‘या’ वेळी जॉनी लिव्हर यांचे बदलले नाव
जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांचा जन्म 14 ऑगस्ट, 1957 रोजी आंध्र प्रदेशातील एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव जॉन प्रकाशराव जानुमाला आहे. जॉनी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मुंबईतील हिंदुस्थान लिव्हर कंपनीत वडिलांसोबत काम करायचे. कामाच्या वेळी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत भयंकर विनोदी शैलीत मजा करत असायचे. त्यानंतर जॉन प्रकाशराव जानुमाल हे हळूहळू इतर कारखान्यातील लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले. त्या सर्व लोकांनी त्यांना ‘जॉनी लिव्हर’ हे नाव दिले. (Comedian Johnny Lever Unknown Facts About His Birthday Special Know How Was Comedy King Named Johnny Lever)

जॉनी लिव्हर यांना सुनील दत्त यांनी दिली होती ‘या’ चित्रपटाची पहिली ऑफर
कारखान्यात काम करणारे जॉनी लिव्हर चाहत्यांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांनी हळूहळू स्टेज शोदेखील करण्यास सुरवात केली. अशा एका प्रसंगी ते स्वतःचा स्टेज शो करत होते, त्या शोला सुपरस्टार सुनील दत्त यांनीही भेट दिली होती. इथेच सुनील यांनी जॉनी यांना पहिल्यांदा बघितले होते. त्यावेळी सुनील यांनी जॉनी लिव्हर यांना ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात पहिली ऑफर दिली. जर सुनील दत्त नसते, तर कदाचित बॉलिवूडला जॉनी लिव्हर मिळाले नसते.

‘या’ काळात जॉनी यांनी नोकरी सोडली  होती
जॉनी लिव्हर यांच्या मुलाला कर्करोग झाला आणि या बातमीने जॉनी यांना हादरवून सोडले होते. याबद्दल बोलताना जॉनी  म्हणतात की, त्यांना धक्काच बसला होता. या त्रासात ते इतका बुडाले होते की, त्यांनी कामापासून स्वत:ला दूर ठेवले होते आणि ते नुसतेच देवाकडे प्रर्थना करत होते. मात्र, काही दिवसांच्या तपासणीनंतर डॉक्टरांनाच नव्हे, तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या मुलाच्या शरीरातून कर्करोग नाहीसा झाला होता.

पहिल्या चित्रपटानंतर जॉनी यांची जादू हळूहळू चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागली. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून त्यांनी चाहत्यांच्या मनावर अभिनयाची छाप सोडली. त्याचबरोबर त्यांच्या विनोदाची जादूही चांगली प्रसिद्ध झाली. जॉनी यांनी ‘चालबाज’ सारख्या सर्व चित्रपटांमध्ये आपल्या विनोदाला तडाका दिला आहे, जॉनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

जॉनी लिव्हर यांना ‘राजा हिंदुस्थानी’, ‘दीवाना मस्ताना’, ‘दुल्हे राजा’, ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ यांसारख्या चित्रपटांसाठी पुरस्कारही देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
जॉनी लिव्हर यांचे खरे नाव आहे ‘जॉनी राव’, जाणून घ्या कसे बनले ‘लिव्हर’, खूपच रंजक आहे किस्सा
वयाच्या चौथ्या वर्षी केली होती सुनिधीने गाण्यास सुरुवात; धड 1 वर्षही नाही टिकले लग्न, मग…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा