Saturday, June 29, 2024

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव आहे ‘जॉनी राव’, जाणून घ्या कसे बनले ‘लिव्हर’, खूपच रंजक आहे किस्सा

‘कॉमेडी’ हा शब्द जरी आपल्या तोंडून काढला, तर आपल्या डोळ्यांपुढे आपसुकच एका कॉमेडियनचं नाव येतं. ते म्हणजे ‘जॉनी लिव्हर’ होय. जॉनी यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. जॉनी यांनी आज आपल्या कारकिर्दीचे शिखर गाठले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक अशा कॉमेडी चित्रपटांचा तडका लावला आहे. कदाचित बॉलिवूडमध्ये क्वचितच असा कोणता तरी सुपरस्टार असावा, ज्याच्यासोबत जॉनी यांनी काम केले नसावे. आज ज्यांना आपण जॉनी म्हणून ओळखतो, त्यांचे खरे नाव हे जॉनी राव हे होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांचे नाव बदलून लोकांनी त्यांनी जॉनी लिव्हर हे नाव दिले होते. जॉनी 14 ऑगस्ट रोजी 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. अशात त्यांच्या या नावामागे एक रंजक किस्सा आहे. तोच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर, मग जॉनी राव कशाप्रकारे जॉनी लिव्हर बनले? जाणून घेऊयात…

लहानपणापासून अभिनेते करायचे मिमिक्री
जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड होती. ते कलाकारांची हुबेहूब मिमिक्री करत असे. अगदी त्यांच्या मिमिक्रीमुळे ते आपल्या जवळच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले होते. लोक त्यांना अनेकदा मिमिक्री करायला सांगत आणि ते आपल्या अभिनयाने लोकांचे भरपूर मनोरंजन करत असत. (Comedian Johny Levers Real Name Is John Rao Know The Story Behind The Word of Lever)

अशाप्रकारे पडलं लिव्हर नाव
खरं तर, जॉनी लिव्हर यांचे वडील त्या काळात देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘हिंदुस्थान लिव्हर’मध्ये काम करायचे. जॉनी अनेकदा वडिलांसोबत ऑफिसला जायचे. ऑफिसमधील कार्यक्रम असला की, सगळे जॉनी यांना मिमिक्री करायला सांगायचे. त्यानंतर ते आपल्या अभिनयाने लोकांना इतके हसवायचे की, लोकांनी त्यांचे नाव कंपनीच्या नावाप्रमाणे बदलून जॉनी लिव्हर ठेवले होते.

रस्त्यावर विकायचे पेन
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉनी यांना मुंबईत खूप संघर्ष करावा लागला होता. उदरनिर्वाहासाठी ते रस्त्यावर पेन विकून पोट भरायचे. आजही ते ज्या चाळीत राहायचे, ती बघायला जातात. जॉनी लिव्हर यांच्यानुसार, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात याच चाळीतून केली होती, त्यामुळे ते ही जागा कधीही विसरू शकत नाहीत.

जॉनी लिव्हर यांचे चित्रपट
जॉनी लिव्हर यांनी 1984 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जॉनी यांनी तब्बल 13 वेळा ‘फिल्मफेअर बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड’साठी तर दोनदा ‘दीवाना मस्ताना’ आणि ‘दुल्हे राजा’साठी नामांकन मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
वयाच्या चौथ्या वर्षी केली होती सुनिधीने गाण्यास सुरुवात; धड 1 वर्षही नाही टिकले लग्न, मग…
आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या सुनिधी चौहानचा असा आहे प्रवास, ‘या’ गाण्यांनी लावले होते प्रेक्षकांना वेड

हे देखील वाचा