Tuesday, September 17, 2024
Home टेलिव्हिजन विनोदवीर कपिल शर्माने सुरू केला ब्लाॅग; म्हणाला, ‘खर्च भागत नाही म्हणून…’

विनोदवीर कपिल शर्माने सुरू केला ब्लाॅग; म्हणाला, ‘खर्च भागत नाही म्हणून…’

आतापर्यंत छोट्या पडद्यावर कित्येक काॅमेडी शो प्रसारित झाले आहेत. पण ‘द कपिल शर्मा शो’ ने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. असंख्य चाहते कपिल शर्माच्या विनोदीबुध्दीच तोंडभरुन कौतुक करत असतात. ‘द कपिल शर्मा शो’मुळे विनोदवीर कपिल शर्माला झगमगत्या विश्वात एक नवीन ओळख मिळाली आहे. हा शो नेहमीच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत असतो. कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

कपिल शर्माचे ( Kapil Sharma )चाहते देशाताच नव्हे तर परदेशात देखील आहेत. कपिल शर्मा त्याच्या काॅमेडी शोद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो. कपिल नेहमीच त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो, मग तो टीव्हीच्या माध्यमातून असो किंवा चित्रपटांच्या माध्यमातून. कपिल शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने नुकतेच एक नविन काम सुरू केले आहे. कपिल शर्माने नविन ब्लाॅग बनवला आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर त्याचा पहिला ब्लाॅग देखील शेअर केला आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. हा व्हिडिओ काही वेळातच ट्रेंडमध्ये येऊ लागला आहे.

कपिल शर्माने त्याच्या पहिल्या ब्लाॅगमध्ये त्याच्या दैनंदिन दिनचऱ्याबद्दल सांगितले आहे. त्याची सुरूवात त्याच्या घरापासून सुरू होते. घरातून बाहेर पडताना कपिल गंमतीने म्हणतो, ‘खर्च भागत नसल्याने मी ब्लाॅग बनवायला सुरुवात केली आहे. यानंतर कपिल शर्मा जिममध्ये जातो आणि त्याच्या वर्कआउट रूटीनची झलक दाखवतो. त्यानंतर तो कपिल शर्मा शोच्या सेटवर निघून जातो. जाताना तो मुंबईतील फिल्मसिटीची झलकही दाखवतो.

सेटवर पोहोचल्यानंतर पडद्यामागे काय घडते याचीही माहिती कपिलने दिली आहे. या ब्लाॅगमध्ये तो विकी कौशल आणि सारा अली खानसोबत कपिल शर्मा शोच्या एका एपिसोडचे शूटिंग करताना दिसत आहे. ग्रीन रुममध्ये असताना कपिल शोच्या दिग्दर्शकांशी गप्पाही मारताना दिसत आहे. त्यावेळी बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, “आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. त्यामुळे आम्हाला काम करावं लागतं. पण आम्ही त्याचा आनंद घेत आहोत. आजकाल आम्ही खूप मेहनत घेत आहोत. सुधा मूर्ती जी आणि अशाच इतर मजेशीर पाहुण्यांसोबतचा एक भाग आम्हाला प्रेरणा देतो.” या दरम्यान कपिलचा हा ब्लाॅग चांगलाच चर्चेत आला आहे.

अधिक वाचा-
हाॅटनेसचा कहर! शहनाझ गिलने समुद्र किनारी केले फाेटाेशूट

खळबळजनक! अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी; ‘ही’ अत्यंत मौल्यवान वस्तू चोरांनी केली लांबपास 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा