मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी शून्यातून त्यांचे विश्व निर्माण करत या ग्लॅमर जगात त्यांचे स्थान तयार केले. अतिशय खडतर मार्गावर अविरत मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये कॉमेडियन कपिल शर्माचे देखील नाव येते. आज कपिल त्याच्या कॉमेडीचा आणि हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. त्याचा शो प्रत्येक जण बघताना दिसतो. आज कपिल अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला आहे. त्याच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी, फॅन्स सर्वच काही आहे. मात्र त्याने हे सर्व त्याच्या जीवावर कमावले आहे. जेव्हा कपिल गिन्नीच्या प्रेमात होता तेव्हा त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र तिच्या आणि त्याच्या आर्थिक परिस्थिती मोठी तफावत होती. नुकतेच कपिलने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत त्याच्या आणि गिन्नीच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले.
जेव्हा कपिल आणि गिन्नीची भेट झाली तेव्हा गिन्नी कपिलला ३/४ वर्षांनी जुनियर होती. मी कमर्शियल आर्ट्समध्ये पदव्युत्तर पदवी घेत होता तर गिन्नी जालंधर कॉलेजमधून तिच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करत होती. कपिल या मुलाखतीमध्ये म्हणाला, “त्याकाळात माझ्याकडे पैशांची खूपच चणचण होती. पैसे मिळवण्यासाठी मी नाटकांमध्ये काम करायचो. त्यासाठी मी सतत एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचो. तेव्हा गिन्नीची आणि माझी ओळख झाली. गिन्नी हुशार होती. त्यासाठी मी तिला माझी सहायक ठेवण्याचा विचार केला. त्यानंतर आम्ही सोबत काम करू लागलो.”
पुढे कपिल म्हणाला, “जेव्हा मला समजले की, गिन्नीला मी आवडतो तेव्हा मी तिला म्हणालो, तू ज्या गाडीतून येते ती माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या कमाईपेक्षा जास्त महाग आहे. या मोठ्या तफावतीसाठीच आपले नाते पुढे जाऊ शकत नाही.” मात्र आज कपिल कोट्यवधींची कमाई करतो. आज टीव्हीवर फक्त कपिलच्याच शोचा बोलबाला आहे. आयुष्यात यश मिळ्वण्यानंतर कपिलने गिन्नीसोबत २०१८ साली लग्न केले. गिन्नीने कपिलला त्याच्या जीवनात चांगल्या वाईट सर्वच काळात साथ दिली. पुढे २०१९ रोजी या दोघांना अनायरा नावाची मुलगी झाली. कपिलला त्रिशान नावाचा एक मुलगा देखील आहे.
हेही वाचा :










