Saturday, June 29, 2024

माेठा खुलासा! शोमध्ये टेलिप्रॉम्प्टरवर पाहून कपिल शर्मा सांगताे जाेक्स; युजर्स म्हणारले, ‘आमचे पंतप्रधान…’

कपिल शर्माला काेणत्याही ओळखीची गरज नाही. ताे आता कॉमेडी विश्वाचा बादशाह बनला आहे. त्याचा ‘द कपिल शर्मा शो‘ हा टेलिव्हिजन जगतातील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो टीआरपीच्या टॉप रेटिंगमध्ये देखील समाविष्ट आहे. या शोच्या माध्यमातून कपिल अनेक वर्षांपासून करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. मात्र, आता त्याच्या या कॉमेडी स्टाइलवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कपिल स्वतःहून नाही तर टेलिप्रॉम्प्टरवर स्क्रिप्ट वाचून कॉमेडी करतो.

कपिल शर्मा (kapil sharma ) त्याच्या कॉमेडीच्या जोरावर नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतो. लोक त्याच्या सेंस ऑफ ह्यूमर आणि जोक्सची खूप प्रशंसा करतात. कपिल शर्माची गणना देशातील टॉप कॉमेडियन्समध्ये केली जाते, पण आता कपिल ट्राेल्सच्या निशाण्यावर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ojasva Vardhan (@cloakofinvisibili.t)

वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कपिलला ट्रोल करत आहेत. मात्र, कपिलचे चाहते त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आणि त्यांनी इतर ट्राेल्सला फटकारण्यास सुरुवात केली.

कपिल शर्माचे चाहते त्याच्या ट्रोल्सपेक्षा जास्त दिसत होते. कपिलच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल्सवर जोरदार टीका केली. एका यूजरने लिहिले, “भाऊ, ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. जर तुम्ही लाईव्ह परफॉर्म करत असाल तर कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दिग्दर्शकाचे काम बिघडणार नाही तर वेळही वाया जाईल.” त्याचवेळी दुसर्‍या युजरने कपिलची बाजू घेत लिहिले की, “भाऊ, तू फक्त कॉमेडी कर.” तर एक चाहता म्हणाला, “कपिलकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत जेव्हा आमचे पंतप्रधान देखील पाहूनच बोलतात.”

अशा प्रकारे कपिलच्या व्हिडिओवर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत.(comedian kapil sharma trolled on his video viral of using teleprompter for jokes fans support him)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गर्लफ्रेंडला खुलेआम किस केल्याने हनी सिंग झाला ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘नशा उतरल्यावर तो व्हिडिओ…’

बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनाही बसलाय ऑनलाइन फसवणुकीचा झटका, वाचा यादी

हे देखील वाचा