प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेते कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ आज 12 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहेत. या जोडप्याने दोन विधींनुसार लग्न केले. त्यांनी पहिले शीख रितीरिवाजानुसार लग्न केले आणि दुसऱ्यांदा हिंदू रितीरिवाजातून गिन्नीला पत्नी बनवले.
गेल्या वर्षी कपिल शर्मा (kapil sharma) याने त्याच्या शोमध्ये त्याच्या लग्नाबद्दल एक मजेदार खुलासा केला होता. कपिलच्या शोमध्ये राज बब्बर आणि जया प्रदा पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. यादरम्यान प्रत्येकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला. दरम्यान, कपिलने राज बब्बर आणि जया प्रदा यांच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती, ज्यात तो स्वतःच्या लग्नातून पळून गेला होता हे सांगितले.
View this post on Instagram
खरं तर, शोमध्ये कपिलने राज बब्बरला विचारलं होतं की, “जेव्हा तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जाता, तेव्हा तुम्ही स्टेजचा वैयक्तिक आढावा घेत होता का?” या प्रश्नाला उत्तर देताना राज बब्बर म्हणाले, “मी राजकारणात आलो तेव्हा आमच्या रॅलीला अनेक चाहते यायचे. आम्हाला त्यांना पुश करायचे नव्हते, पण काहीजण असे होते जे उड्या मारून स्टेजवर चढायचे. प्रचंड गर्दी जमायची.” राज बब्बरकडून हे ऐकून कपिल म्हणाला, “मी याच्याशी रिलेट करू शकतो. माझ्या स्वतःच्या लग्नातही हे घडले आहे. अनेकांनी स्टेजला घेराव घातला हाेतरा परिणामी मी धावत माझ्या खोलीत आलो आणि पुन्हा बाहेर गेलाेच नाही. तेवढ्यात शोमध्ये बसलेले सर्व लोक जोरजोरात हसायला लागले.
View this post on Instagram
गिन्नी कपिलची विद्यार्थिनी होती आणि खूप हुशार होती. त्या दिवसांत गिन्नी जालंधरच्या गर्ल्स कॉलेजमध्ये शिकत होती आणि कमर्शिअल आर्ट्समध्ये पीजी डिप्लोमा करत होती. त्यासोबतच ती नाटकात भाग घ्यायची आणि इतर कॉलेजमध्येही जायची. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात.
कपिलने 2018 मध्ये गिन्नीशी लग्न केले आणि दोघांना दोन मुले आहेत. मुलगी अनयरा शर्मा हिचा जन्म 2019 मध्ये झाला तर मुलागा त्रिशन याचा जन्म 2021 मध्ये झाला. नुकतेच कपिलने मुलगी अनायराचा तिसरा वाढदिवस साजरा केला हाेता आणि सेलिब्रेशनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले हाेते. (kapil sharma ran away from his own wedding told the funny story)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
घटस्फाेटाच्या चर्चेवरून उर्मिला कोठारेचं माेठं वक्तव्य; म्हणाली, ‘ब्रेकअप झालं…’
बाबो! असे काय घडले की, शाहीद समोर मीराने इशान खट्टरला मारली कानाखाली… कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का