Saturday, June 15, 2024

कॉमेडियन कृष्णा अभिषेक वाढदिवस, ‘त्या’ एका ट्विटमुळे सुरू झाला होता मामा-भाच्याचा वाद

कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) हा हिंदी मनोरंजन जगतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. आपल्या अचूक  कॉमेडी  टायमिंगने त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अनेक कॉमेडी शोमधून त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतो. परंतु कृष्णा अभिषेक त्याच्या अभिनयापेक्षा मामा गोविंदासोबतच्या वादामुळेच सर्वात चर्चेत राहिला होता. आज (३० मे) कृष्णा अभिषेकचा वाढदिवस. जाणून घेऊ या त्यांच्या या वादाबद्दलचे रंजक किस्से. 

कॉमेडियन कृष्णा आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यातील वाद कश्मीरा शाहच्या एका ट्विटवरून सुरू झाला. कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाने आधी यायला नकार दिला होता. पण कृष्णाच्या समजूतीनंतर त्याने होकार दिला.यावेळी  कृष्णाची पत्नी कश्मिराने एक ट्विट केले, ज्यामध्ये “काही लोक पैशासाठी नाचतात,” असे लिहिले होते. गोविंदाची पत्नी सुनीता यांना कश्मिराचे हे ट्विट त्यांच्या कुटुंबासाठी असल्याचे वाटले, त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला.

कश्मीरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात बरीच टिका टिप्पन्नी केली. कृष्णा अभिषेक आणि गोविंदाच्या कुटुंबात सुरू असलेला वाद आणखी चिघळला जेव्हा गोविंदा आणि सुनीता कृष्णाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर राहिले नाहीत. यादरम्यान सुनीताने सांगितले होते की, “मला या वाढदिवसाच्या पार्टीचे निमंत्रण दिले गेले नाही.” पण कृष्णाने दुसर्‍या एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी मामा गोविंदा आणि मामी सुनिता यांना पार्टीसाठी आमंत्रित केले आहे.

https://www.instagram.com/p/CPNls1tB_0O/?utm_source=ig_web_copy_link

या सगळ्यात कृष्णा अभिषेक यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. कृष्णाने दावा केला होता की गोविंदा आपल्या मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात आला नव्हता आणि त्यामुळेच तो आपल्या मामावर रागावला होता. दुसरीकडे, गोविंदाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कृष्णाच्या मुलाला पाहण्याची चर्चा केली होती. कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद कपिल शर्माच्या शोमध्येही पाहायला मिळाला आहे. एकदा गोविंदा पत्नी सुनीतासोबत कपिलच्या शोमध्ये पोहोचला होता आणि कृष्णा अभिषेकने त्या एपिसोडमध्ये तो सहभागी झाला नाही, त्यानंतर पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद सुरू झाला. या घटनेनंतर दोघांमधील भांडण चव्हाट्यावर आले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
हेमा मालिनी यांनी फाेटाे शेअर करत संसद भवनाची दाखवली सुंदर झलक, सांगितली ‘ही’ खास गाेष्ट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा